Published On : Tue, Mar 9th, 2021

ऑटो स्टँडसाठी जागा सुचवा मनपा वाहतुक विभागाचे आवाहन

नागपूर : नागपूर शहरात दिवसेंदिवस पार्किंगची समस्या वाढत असल्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी अवैद्य पार्किंग केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून वाहतुकीची कोंडी होत आहे. नुकतेच नागपूर शहरातील आटो चालकांच्या संघटनेने महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांना भेटून आटो स्टँडसाठी नागपूर महानगरपालिकेने जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.

वाहतुक विभाग मनपा नागपूरचे वतीने शहरातील आटो संघटना यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी नागपूर शहरात अधिकृत आटो स्टँड तयार करण्यासाठी सुयोग्य जागा सुचवाव्यात त्यांनी जागा सुचविल्यानंतर त्याची नागरी संघटना, वाहतुक पोलिस विभाग, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कारपोरेशन मार्फत प्रस्तावित स्थळांची नियमाप्रमाणे छाननी करुन यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. जे विद्यमान काही आटो स्टँड आहेत ते योग्य जागी नसल्याने त्याचे स्थान बदलण्यावर सुध्दा प्रशासनातर्फे विचार करण्यात येत आहेत.

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूरच्या जनतेला परवडणारी परिवहन व्यवस्था उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य जागी ऑटो स्टँड उपलब्ध करणे ही आवश्यक बाब झाली आहे. आटो चालकामार्फत स्वस्त आणि परवडणारी परिवहन व्यवस्था उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य जागा निश्चीत करणे आवश्यक आहे ज्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होता कामा नये, अशी माहिती श्रीकांत देशपांडे वाहतुक अभियंता यांनी दिली. सध्या नागपूरात २५५ आटो स्टँड आहे. नवीन वसाहती मध्ये ऑटो स्टँड ची मागणी होत आहे.

Advertisement
Advertisement