चंद्रपूर – महाराष्ट्रातील ओयो हॉटेल्सच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. राज्याच्या माजी वित्तमंत्री आणि सद्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ओयो हॉटेल्सच्या संचालनावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. विधानसभा सत्रादरम्यान मुनगंटीवार यांनी म्हटले की, ओयो हॉटेल्समध्ये असामाजिक आणि गैरकानूनी क्रियाकलाप वाढत आहेत, ज्याची अनेक तक्रारी प्रशासनाकडे पोहचली आहेत.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “काही लोक ओयो हॉटेल्समध्ये काही तासांसाठी रूम भाड्याने घेत आहेत, आणि त्या ठिकाणी अनैतिक व गैरकानूनी गतिविध्या होतात. हे केवळ नैतिकतेच्या दृष्टीनेच नव्हे, तर कायदेशीर दृष्टिकोनातून देखील गंभीर आहे.” मुनगंटीवार यांनी यावर लक्ष वेधले की, ओयो हॉटेल्स बहुतेकदा शहरांपासून दूर, सुनसान भागात सुरू केली जात आहेत, जिथे प्रशासनाची देखरेख कमी असते.
त्यांनी पुढे म्हटले की, “या हॉटेल्सची उभारणी करतांना स्थानिक ग्रामपंचायती, नगरपरिषद किंवा महानगरपालिकेची परवानगी घेतली जात नाही. हे कायद्याचा उल्लंघन करणे आहे.” ओयो हॉटेल्सला काही तासांसाठी कक्ष भाड्याने देण्याच्या पद्धतीवर मुनगंटीवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “एक तासासाठी कक्ष भाड्याने देण्याचा उद्देश काय आहे? या हॉटेल्समध्ये अनैतिक कामे सुरू आहेत का? स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना याची माहिती नाही का?” असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.
मुनगंटीवार यांनी राज्य गृहविभागाला ओयो हॉटेल्सच्या कार्यपद्धतीची सखोल तपासणी करण्याची मागणी केली. राज्यात किती ओयो हॉटेल्स कार्यरत आहेत, याची सुस्पष्ट माहिती गोळा केली पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांनी सरकारला चेतावणी दिली की, “जर यावर वेळीच कारवाई केली नाही, तर हे युवकांसाठी धोकादायक ठरू शकते आणि गुन्हेगारीला खतपाणी मिळू शकते.मुनगंटीवार यांचे हे आरोप राज्य सरकारला आणि संबंधित विभागांना गंभीर पातळीवर विचार करण्यास भाग पाडू शकतात.