Published On : Tue, Sep 28th, 2021

नागपुरात प्रकृती असवस्थेनंतर अँजियोप्लास्टीद्वारे यशस्वी शस्त्रक्रीया

पीरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांची माहिती

नागपुर: प्रणेते आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (पीरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांची प्रकृती स्थिर असून ते उपचाराला उत्तम प्रतिसाद देत असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि कवाडे सर यांचे पुत्र जयदीप कवाडे यांनी मंगळवारी दिली आहे. शनिवारी प्रकृती अस्वस्थतेमुळे प्रा.कवाडे सरांना रामदासपेठ येथील नामांकित अरनेजा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. विविध तपासण्याअंती मिळालेल्या निष्कर्षानंतर ह्रदयातील ब्लॉकेजेसमुळे प्रा.कवाडे सरांवर अँजियोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Advertisement

डॉ. जसपाल अरनेजा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांची एक विशेष टीम प्रा.कवाडे यांच्या उपचार करीत आहे. शस्त्रक्रियेनंतर प्रा.कवाडे यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारांना ते उत्तम प्रतिसाद देत आहेत. लवकरच ते संघटना कार्यात नव्या ऊर्जेने रूजू होती, अशी माहिती जयदीप कवाडे यांनी दिली आहे. असंख्य कार्यकर्ते,पदाधिकारी तसेच संघटनेचे प्रेम आणि आशिर्वाद सरांच्या पाठिशी असल्याने ते लवकर ठणठणीत बरे होतील, असे जयदीप कवाडे म्हणाले.

Advertisement

९९ टक्के ब्लॉकेएज
रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्वप्रथम अँजियोग्राफी करण्यात आली. यात ९९ टक्के ब्लॉकेएज आढळून आल्याचे समाजताच डॉ. जसपाल अरनेजा यांनी जयदीप कवाडेंशी चर्चा करून अँजियोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याचे सुचिवले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement