Published On : Sat, Sep 7th, 2019

कामठी नगर परिषद सफाई कर्मचाऱ्याचा भर सकाळी निर्घृण खूण

Advertisement

कामठी:-नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 हद्दीत येणाऱ्या नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीतील समता नगर परिसरात भर दिवसा सौरभ सोमकुवर नामक 19 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केल्याच्या घटनेला 15 दिवस लोटत नाहीत तोच आज जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील दिवाण मंदिर जवळ कामठी नगर परिषद च्या एका सफाई कर्मचाऱ्याचा भर सकाळी साडे सहा दरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी तीक्ष्ण अवजाराने सपासप वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली असून मृतक सफाई कर्मचाऱ्याचे नाव सतीश किशोर धामती वय 28 वर्षे रा.कोळसा टाल कामठी असे आहे.खून करण्याचे कारण अजूनही गुलदस्त्यात असून हल्लेखोरांचा अजूनही शोध लागलेला नाही मात्र जुन्या वैमनस्यातून हा खून झाल्याच्या चर्चेला उधाण आहे.

प्राप्त माहितीनुसार सदर मृतक सफाई कर्मचाऱ्याचे एक महिन्यांपूर्वी कामठी नागपूर मार्गावरील भाटिया लॉन मध्ये चांगलेच भांडण रंगले होते या भांडणाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने त्याच्याच वस्तीतील रहिवासी हल्लेखरांनी नियोजित वेळेनुसार आज सकाळी सहा वाजता दिवाण मंदिर जवळ सफाई काम करीत असता दडी मारून बसलेल्या हल्लेखोरांनी त्वरित हल्ला चढवीत धारदार तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करीत घटनास्थळाहुन पळ काढला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून नजीकच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविले असता परिस्थिती नाजूक असल्याने उपचारार्थ आशा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले मात्र काही वेळेतच डॉक्टर ने मृत घोषित केले मात्र मृत्यूपूर्वी मृतक ने दिलेल्या बयानामध्ये आरोपीचे नाव सांगितले असल्याची माहिती आहे.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसांनी यासंदर्भात अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 302 अनव्ये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे. तर मृतकाच्या पार्थिवावर पुढील उत्तरीय तपासणी साठी नागपूर च्या मेडिकल हॉस्पिटल येथे शवविच्छेदनार्थ हलवीन्यात आले.मृतकाच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी व 7 महिन्याची बालिका असा आप्तपरिवार आहे.म

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement
Advertisement