Published On : Tue, Mar 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

ऐतिहासिक शोभायात्रेसाठी मनपाची जय्यत तयारी

महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी घेतला तयारीचा आढावा
Advertisement

नागपूर,: श्री रामनवमीनिमित्त नागपूरचा सांस्कृतिक वारसा असलेल्या पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणारी ऐतिहासिक शोभायात्रा कोणत्याही अडचणीशिवाय पार पाडण्यासाठी तसेच भाविकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मनपा प्रशासनाने कोणतीही कमतरता ठेऊ नये, असे निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी मंगळवारी(ता.२४) मनपा प्रशासनाला दिले. तदनंतर त्यांनी जुना भंडारा रोड, पोद्दारेश्वर राम मंदिर, हंसापुरी, टिमकी, बडकस चौक, महाल मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करीत शोभा यात्रेच्या मार्गावरील स्वच्छता, राखण्यासह त्यांनी मार्गावर असलेले वायरिंग संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले यावेळी मनपाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

येत्या 26 मार्च रोजी पोद्दारेश्वर राम मंदिरातून ही शोभायात्रा निघणार आहे. नागपूरच्या सर्व प्रमुख मार्गावरून जाणारी ही शोभायात्रा नागपूर सांस्कृतिक वारश्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. या शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या रामभक्तांना कोणताही त्रास होणार नाही व मनपाकडून सर्व नागरी सुविधा पुरविण्याच्या संदर्भात महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी संबंधित सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. यावेळी स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन, मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, नगरसेवक श्री. श्रीकांत आगलावे, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, उपायुक्त श्री. राजेश भगत, उपायुक्त श्री. गणेश राठोड, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, कार्यकारी अभियंता राजेंद्र राठोड, कार्यकारी अभियंता श्री. गुरनुले, वृक्षसंवर्धन श्री. अमोल चौरपगार, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. तुषार बारहाते, उप अभियंता श्री. अभिजीत बुरे, पोद्दारेश्वर राम मंदिरचे श्री. पुनीत पोद्दार, श्री. शांतीकुमार शर्मा, श्री.सुरज अग्रवाल आदी उपस्थित होते.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोद्दारेश्वर राममंदिरातून निघणारी ही शोभायात्रा सेंट्रल एव्हेन्यू, डागा हॉस्पिटल, इतवारी, महाल या भागातून जाणार आहे. यासंदर्भात महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी अधिकार्यांना काही सूचना केल्या. हा भाग दाट लोकवस्तीचा असल्याने शोभायात्रा सुरळीत व विनाअडथळा पार पाडण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. या रस्ता असलेले बांधकाम साहित्य तात्काळ उचलण्याची कारवाई करावी, त्याचप्रमाणे या भागात असलेले विद्युत तार लोंबकळत असल्याने शोभायात्रेतील चित्ररथांना अडथळा येण्याची शक्यता आहे. यासाठी येथील विजेच्या तारा वर ओढून घ्याव्‌या, तसेच या शोभायात्रेसोबत एक अग्निशमन विभागाची शिडी असलेली गाडी ठेवावी, अशी सूचनाही त्यांनी केली. उद्यान विभागाने या मार्गावरील झाडांच्या फांद्या कापून शोभायात्रेचे मार्गक्रमण सुरळीत होईल, याची काळजी घ्यावी, असे निर्देश महापौरांनी दिले.

यावेळी प्रत्येक विभागाच्या प्रमुखांनी शोभायात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी मनपातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती महापौरांना दिली. शोभायात्रेच्या मार्गावरील सर्व पथदिवे सुरू राहील, याची काळजी घ्यावी. तसेच अतिरिक्त दिवे लावण्याची व्यवस्था करावी, या शोभायात्रे दरम्यान काही ठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात यावी, शोभायात्रा रात्री उशिरा पर्यंत शहरातील विविध भागातून जात असते. यात कुणाला प्राथमिक उपचाराची आवश्यकता भासल्यास मनपाच्या आरोग्य विभागाने ॲम्बुलन्सची व्यवस्था करावी, यासंदर्भात आवश्यक औषधांचा साठाही ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

रस्त्यांचे डांबरीकरण करावे
ज्या मार्गावरून ही शोभायात्रा जाणार आहे. त्या मार्गावरील डांबरीकरणाची आवश्यकता असल्यास तेथे हॉट मिक्स प्लांटच्या माध्यमातून तात्काळ रस्त्यांचे डांबरीकरण करावे, काही ठिकाणी रस्त्यांच्या बांधकाम सुरू असल्याने जलवाहिन्या फुटल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या जलवाहिन्या तात्काळ बंद कराव्‌या, असे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.

शहर स्वच्छतेची मोहिम
शोभायात्रा मार्गावरून गेल्यानंतर लगेच रस्ता स्वच्छ ठेवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे सफाई कामगार तैनात राहणार आहे. शोभायात्रा गेल्यानंतर लगेच रस्त्यांची साफसफाई केली जाणार आहे. यामुळे शोभायात्रेच्या दुसर्या दिवशी शहरातील या मार्गावर कोणताही कचरा दिसणार नाही.

ऐतिहासिक शोभायात्रा यशस्वी करा

पोद्दारेश्वर राममंदिरातून निघणारी ही शोभायात्रा सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारी व एक ऐतिहासिक शोभायात्रा आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा रामभक्तांच्या या शोभायात्रेला यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे,. असे आवाहन महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी यावेळी केले.

Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges