नागपूर : शहर पुरवठा विभागाच्या ‘ड’ परिमंडळ कार्यालयाने शहरात हॉटेल व रेस्टॉरंटवर धडक कारवाई करत घरगुती वापरासाठी असलेले शासन अनुदानीत गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. २० मार्च २०२६ रोजी विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबवण्यात आली होती.
या तपासणीदरम्यान जाधव चौक बसस्थानक परिसरातील अन्नपूर्णा रेस्टॉरंटमधून दोन सिलेंडर, कान्हा अमृततुल्य चहा स्टॉलमधून दोन सिलेंडर, शिवहरे दोसा हाऊसमधून एक सिलेंडर तर रेल्वे स्टेशन परिसरातील राजा रेस्टॉरंट भोजनालयातून एक सिलेंडर असा एकूण सहा घरगुती वापराचे सिलेंडर जप्त करण्यात आले.
हे सर्व सिलेंडर शासनाकडून अनुदानित असल्याने त्यांचा व्यावसायिक वापर करणे नियमबाह्य आहे. संबंधित हॉटेल चालकांकडून नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती परिमंडळ अधिकारी, ‘ड’ परिमंडळ कार्यालयाने दिली.
शहर पुरवठा विभागाकडून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





