
नागपूर: शहरातील वाठोडा पोलीस ठाणे हद्दीतून एक चिंताजनक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादामुळे मानसिक तणावात असलेल्या एका पोलिस जवानाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे. संबंधित जवानाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाठोडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले जयवंत झाडे यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच शेजारी राहणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याने तत्काळ मदत करत त्यांना नंदनवन परिसरातील ‘7 स्टार’ रुग्णालयात हलवले.
सध्या जयवंत झाडे यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
दरम्यान, मागील काही महिन्यांपासून त्यांचा पत्नीशी कौटुंबिक वाद सुरू असल्यामुळे ते मानसिक तणावात होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. कुटुंबीयांनीही घरात दीर्घकाळ तणावाचे वातावरण असल्याची पुष्टी केली आहे.या घटनेची वाठोडा पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून, नेमके कारण काय याचा तपास करण्यात येत आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...




