Published On : Thu, Apr 24th, 2025
By Nagpur Today Nagpur News

आरपीएफ नागपूर विभागाची यशस्वी घोडदौड; वर्षभरात ग्राहकांना दिला सुरक्षिततेचा आधार

Advertisement

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) नागपूर विभागाने आर्थिक वर्ष २०२४-२५ दरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या विविध मोहिमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अपहृत बालकांची सुटका, अंमली पदार्थांचे तस्करीविरोधी कारवाई, हरवलेले सामान परत देणे, मानवी तस्करीविरोधी मोहिमा अशा अनेक क्षेत्रांमध्ये विभागाने भरीव कामगिरी बजावली आहे.

‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत २०७ बालकांची सुटका-
देशभरातील हरवलेली व घरातून पळून गेलेली बालके त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत नागपूर विभागाने १२० मुले व ८७ मुलींची सुटका केली.

Gold Rate
24 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 98,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ऑपरेशन जीवन रक्षा अंतर्गत प्राण वाचवण्यातही पुढाकार –
आरपीएफ कर्मचाऱ्यांनी ‘ऑपरेशन जीवन रक्षा’ अंतर्गत धाडसी कामगिरी करत ७ प्रवाशांचे प्राण वाचवले.

ऑपरेशन AAHT अंतर्गत मानवी तस्करीविरोधात कडक कारवाई –
‘ऑपरेशन अ‍ॅक्शन अ‍ॅगेन्स्ट ह्युमन ट्रॅफिकिंग’ (AAHT) अंतर्गत २ प्रकरणे नोंदवण्यात आली. यात ९ बालकांची सुटका करण्यात आली असून, ६ मानव तस्करांना अटक करण्यात आली.

ऑपरेशन नार्कोसअंतर्गत अंमली पदार्थविरोधी कारवाई –
‘ऑपरेशन नार्कोस’ अंतर्गत ४४४.१५६ किलो गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची बाजारातील किंमत सुमारे ₹६४.५२ लाख इतकी आहे. या कारवाईत ११ आरोपींना अटक करण्यात आली.

ऑपरेशन सतर्क अंतर्गत बेकायदेशीर दारूविक्रीवर धडक –
‘ऑपरेशन सतर्क’ अंतर्गत ६४ प्रकरणांमध्ये ९,८५७ दारूच्या बाटल्या (₹१२.४० लाख किमतीच्या) जप्त करण्यात आल्या असून, ३६ आरोपींना अटक करण्यात आली.

तिकीट दलालांविरोधात मोहीम –
‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत ७६ प्रकरणांत १,२५१ रेल्वे तिकिटे जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत ३१.४६ लाख इतकी होती. ८८ दलालांवर कारवाई करण्यात आली.

ऑपरेशन अमानतअंतर्गत हरवलेले सामान परत –
प्रवाशांचे हरवलेले ४६४ सामानांचे बॅग्स, वस्तू इत्यादी परत करण्यात आले, ज्याची एकूण किंमत ₹९४.१० लाखांहून अधिक आहे.

इतर सामाजिक उपक्रमांतही सहभाग-
‘ऑपरेशन डिग्निटी’ अंतर्गत ५१ असहाय व संकटात सापडलेल्या व्यक्तींना मदत करण्यात आली. ‘ऑपरेशन मातृशक्ती’ अंतर्गत एका गरोदर प्रवासी महिलेला तात्काळ वैद्यकीय मदत पुरवण्यात आली.

चोरीच्या घटनांत तपासात यश-
९६ चोरीच्या प्रकरणांत ११३ आरोपींना अटक करण्यात आली. प्रवाशांचे मौल्यवान सामान हस्तगत करण्यात आले. “यशस्वी भव” या ब्रीदवाक्याखाली, आरपीएफ नागपूर विभाग नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि सेवा-सुविधांसाठी अविरत प्रयत्नशील राहिला आहे.

Advertisement
Advertisement