Published On : Mon, Feb 24th, 2020

बिडगाव येथील अतिक्रमित जागेचे अतिक्रमण काढण्यासंदर्भात तहसिलदारला सामूहिक निवेदन सादर

कामठी :-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या बिडगाव येथील खसरा क्र ३१, ३२,33 ची जागा सदर महसूल 7/12नुसार मीलकीयत सरकारी खदान सरकार ह्या मालकाची जागा असून ह्या जागेवर राजकुमार अमृत मेश्राम यांचे कृष्ठरोग महारोफ दवाखाना यांनी अतिक्रमण केले आहे.यासंदर्भात बिडगाव ग्रामपंचायत च्या वतीने संमत पाठपुरावा करण्यात आला परंतु सदर अतिक्रमित प्रकरण हे न्यायालयीन चौकटीत असल्याने अतिक्रमण काढण्याला स्थगिती देण्यात आल्याने सदर अतिक्रमित जागेवरील अतिक्रमण काढता येऊ शकले नाही मात्र न्यायालयीन प्रक्रियेनुसार या अतिक्रमित जागेवरील स्थगिती काढण्यात आली असल्याने मागील कित्येक महिन्यापासून अतिक्रमण करून अतिक्रमित जागेवर मालकी डल्ला मारलेल्या जागेचा अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसह बिडगाव ग्रामपंचायत च्या वतीने नायब तहसीलदार रणजित दुसावार यांना सामूहिक निवेदन सादर करीत लवकरात लवकर अतिक्रमण काढण्याची मागणी करण्यात आली.

याप्रसंगी निवेदन सादर करताना सरपंच निकेश कातुरे , नागपूर जिल्हा परिषद चे विरोधी पक्ष नेता अनिल निधान, भाजप चे पदाधिकारी रमेश चिकटे, भाजप कामठी तालुकाध्यक्ष किशोर बेले, नरेश मोटघरे, संतोष तिजारे, सचेलाल घोडमारे, सचिन डांगे, अजय बिसेन, अजय शेंडे,रामेश्वर वाडीभस्मे, विनोद वाठ, तेजराम मेश्राम आदी उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी