Published On : Mon, Sep 23rd, 2019

अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता विकास शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षण संपन्न

रामटेक:-रामटेक पंचायत समिती, शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षकांचे पाच दिवसीय मुलभूत क्षमता विकास प्रशिक्षणाचा पहिला टप्पा प्रोव्हिडंस काॅन्व्हेंट मनसर येथे नुकताच पार पडला.

Advertisement
Advertisement

प्रशिक्षणाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी संगीता तभाणे,शिक्षण विस्तार अधिकारी श्यामसुंदर कुवारे विनोद शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यांत आले.असर सर्व्हेक्षणानुसार तालुक्यातील अप्रगत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रगत करण्याच्या दृष्टीने शिक्षकांना कृतियुक्त अध्यापन,शैक्षणिक साहित्य तसेच आनंददायी उपक्रमांतून शिक्षण देण्याकरीता माननीय आयुक्त संजीव कुमार यांच्या संकल्पनेतील या प्रशिक्षणात विजय धनालकोटवाल,संध्या झिले,अल्का पालवे,विनोद शेंडे,शमी कडबे,मनिषा शाहाकार,संघपाल मेश्राम,पंकज धार्मिक,अनिल राख व प्रविण भक्ते या प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले,

Advertisement

सदर प्रशिक्षणात११६प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेवून प्रशिक्षण पुर्ण केले. गटशिक्षणधिकारी संगीता तभाणे यांनी प्रशिक्षणातील अनुभवाचा दैनंदिन अध्यापनात वापर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे असे प्रतिपादन समारोपिय कार्यक्रमात केले. शिक्षण विस्तार अधिकारी एस पी कुवारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे संचालन शमी कडबे यांनी तर साधनव्यक्ती विनोद शेंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement