Published On : Mon, Sep 23rd, 2019

आदर्श आचारांहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाहो होणार:-तहसीलदार अरविंद हिंगे

Advertisement

कामठी :-विविध राजकीय यात्रांनी राजकारण गरम झाल्यावर भारतीय निवडणूक आयोगाने अखेर काल शनिवार 21 सप्टेंबर ला महाराष्ट्रातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांची आदर्श आचारसंहिता जारी केली आहे यानुसार 58 कामठी विधानसभा मतदार संघाकरिता 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 24 ऑक्टोबर ला मतमोजणी होणार आहे .निवडणुकीची प्रक्रिया 27 ऑक्टोबर रोजी पूर्ण होईल .या विधानसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे तसेच आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाही केली जाणार आहे तेव्हा कामठी विधांनसभेकरिता 21 ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांनी उत्साहाने मतदान करून लोकशाहीच्या या महाकुंभात सहभाग घ्यावा दरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाही करीत एफआयआर सुद्धा दाखल करणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एसडीओ शाम मंदनूरकर यांच्या मार्गदर्शनार्थ सहाययक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अरविंद हिंगे यांनी कामठी तहसील कार्यालयात आयोजित विशेष बैठकीत व्यक्त केले.

यावेळी त्यांनी 58 कामठी विधानसभा मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्यामध्ये कामठी विधानसभा मतदार संघ नामनिर्देशन पत्र स्वीकारणे 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2019 सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्ट्या वगळून), दिनांक 5 ऑक्टोबर ला नामनिर्देशन पत्राची छाननी, दिनांक 5 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 11 वाजेपासून उमेदवारी अर्ज मागे घेणे .

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दिनांक 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत , मतदान दिनांक 21 ऑक्टोबर , मतमोजणी दिनांक 24 ऑक्टोबर जाहीर करण्यात आली आहे.आदर्श आचारसंहिता लागू झाली असून राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे,या काळात ठिकठिकाणी लागलेले राजकीय बॅनर व पोस्टर्स , बॅनर्स, फ्लेक्स, कटआऊट्स 24 तासाच्या आत काढून घेण्यात यावे, तसेच सार्वजनिक इमारतीवरील जसे रेल्वे स्टेशन , बसस्थानक, शासकीय बसेस, टेलिफोन खांब, विदडूत खांब, , नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था इमारतीवरील जाहिराती 48 तासाच्या आत काढण्याची कारवाही करावी, उमेदवारांना 28 लक्ष रुपये पर्यंत निवडणूक खर्च करायचा असून निवडणुकीच्या संपूर्ण कालावधीत 10 हजार रुपये रोख खर्च करता येणार आहे तर इतर व्यवहार चेक, आरटीजीएस अथवा ऑनलाइन पद्धतीने करावयाचे आहेत तसेच उमेदवारांना गुन्हेगारी पाश्वरभूमीची पूर्ण माहिती द्यावयाची आहे विशेष म्हणजे 50 हजाराच्या वर रोख रक्कम आढळल्यास त्याची संपूर्ण माहिती द्यावयाची आहे तसेच 1 लाखाच्या वर बँक व्यवहार झाल्यास त्याचीही माहिती निवडणूक विभागाला सविस्तर द्यावी लागणार आहे. आदर्श आचारसंहिता असल्याने उमेदवारांना जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी 1 दिवसापूर्वी परवानगी घेने आवश्यक राहणार आहे तसेच सोशल मोडियावर होणारा प्रचारावर एमसीएमसी कमिटीच्या माध्यमातून नजर राहणार असल्याचे सांगितले.एकंदरीत पारदर्शक व शांतता प्रिय वातावरणात निवडणूक पार पडावी व आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये या दृष्टिकोनातून प्रशासन कार्य करीत असल्याची माहिती दिली.

तसेच मतदारांच्या सुविधेसाठी 1950 हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून त्यावर मतदार निवडणूक विषयी माहिती प्राप्त करू शकतो तसेच निवडणूक प्रक्रिये दरम्यान आदर्श आचारसंहिता उल्लंघन वा तत्सम तक्रारी असल्यास सामान्य नागरिक एक फोटो चा व्हिडीओ काढून C-VIGILया ऍप्सवर माहिती टाकून तक्रार करू शकतात त्यानंतर भरारी पथक सदर तक्रारीची स्थळावर जाऊन शहानिशा करून तक्रारींवर कारवाही करण्यात येईल .

कामठी विधानसभा मतदार संघातील कामठी, मौदा व नागपूर ग्रामीण मधील एकूण मतदार संख्या -4 लक्ष 38 हजार 417 असून यामध्ये पुरुष मतदार 2 लक्ष 25 हजार 6 मतदार तर स्त्री मतदार 2 लक्ष 13 हजार 406 व 5 तृतीयपंथी मतदार आहेत.यानुसार एकूण 494 मतदान केंद्रे आहेत यामध्ये 4 संवेदनशील मतदान केंद्राचा समावेश आहे तसेच मतदान केंद्रावर दिव्यांग , गरोदर महिला यांना मतदान सुलभ पद्धतीने करता यावे यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

कामठी विधानसभा निवडणूक अधिकारी शयाम मदनूरकर यांच्या मार्गदर्शनार्थ सहाययक निवडणूक अधिकारी तहसिलदार अरविंद हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या आचारसंहिता विशेष बैठकीत कामठी नगर परिषद मुख्याधिकारी रमाकांत डाके, नायब तहसीलदार कावटी, जी जी प सदस्य कांग्रेस चे नाना कंभाले, प्रहार चे मंगेश देशमुख, बीएसपी चे किशोर गेडाम, माजी सैनिक चंद्रशेखर अरगुल्लेवार, शेषराव ढबाले, शिवसेना विद्यार्थी सेना चे छववा यादव, राजू चहांदे , ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत चौबे, प्रेम शर्मा, राकेश फेंडर, दिलीप मेश्राम, मुकेश कांबळे , राजा देशमुख, आदी उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement