Published On : Sat, May 31st, 2025
By Nagpur Today Nagpur News

विद्यार्थ्यांनी रियल-टाइम टेक ऑपरेशन्स शिकण्यासाठी ऑरेंज सिटी वॉटरला भेट दिली..

'ऑरेंज सिटी वॉटर'ला टाटा स्ट्राईव्हच्या विद्यार्थ्यांची अभ्यास भेट

नागपूर, : ऑरेंज सिटी वॉटर प्रायव्हेट लिमिटेड (ओसीडब्ल्यू) द्वारे संपूर्ण शहरात नियमित होणारा पाणीपुरवठा आणि यासंदर्भातील व्यवस्थापन, नागरिकांच्या तक्रारी व त्यावरील कार्यवाही या सर्व तांत्रिक बाबींचे धडे टाटा स्ट्राईव्ह (Tata STRIVE)च्या विद्यार्थ्यांनी घेतले. शुक्रवारी (ता.30) टाटा स्ट्राईव्‍ह संस्थेच्या युजर एक्सपीरियन्स (यूएक्स) या डिझाईन विषयाशी संबंधित 20 विद्यार्थ्यांनी ओसीडब्ल्यू ला भेट दिली.

ओसीडब्ल्यू द्वारे शैक्षणिक सहभाग आणि भविष्यातील व्यावसायिकांना स्मार्ट वॉटर सोल्युशन्सबद्दल जागरुकतेच्या उपक्रमांतर्गत या शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

Gold Rate
1 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,17,100 /-
Gold 22 KT ₹ 1,08,900 /-
Silver/Kg ₹ 1,45,800/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विद्यार्थ्यांच्या या अभ्यास भेटीमध्ये त्यांना आधुनिक जलप्रणाली व्यवस्थापन आणि दैनंदिन कामकाजात वापरल्या जाणाऱ्या डिजिटल साधनांची प्रत्यक्ष अनुभूती देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी ओसीडब्ल्यूच्या अत्याधुनिक हबग्रेड (Hubgrade) सुविधेची देखील प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन माहिती जाणून घेतली. ओसीडब्ल्यू द्वारे त्यांना पाणीपुरवठा आणि व्यवस्थापनातील डिजिटल पायाभूत सुविधांची सखोल माहिती देण्यात आली. निर्णय प्रक्रिया आणि सेवा कार्यक्षमता वाढविण्यात सहकार्य करणारे विविध सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म्स, डेटा डॅशबोर्ड्स आणि विश्लेषणात्मक साधने यांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.

यासोबतच विद्यार्थ्यांनी ओसीडब्ल्यू च्या ‘इनबाउंड’ आणि ‘आऊटबाउंड कॉल सेंटर’च्या कामकाजाची देखील अनुभूती घेतली. ही केंद्रे ग्राहक संवाद आणि सेवा तक्रार निवारणासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या युजर एक्सपीरियन्स (यूएक्स) अभ्यासातील संकल्पनांचा प्रत्यक्ष ग्राहक सेवा इंटरफेस आणि प्रणाली डिझाईनमध्ये होणारा उपयोग याविषयी प्रत्यक्षरित्या समजून घेण्याची संधी मिळाली.
पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.

Advertisement
Advertisement