Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Nov 15th, 2019

  विद्यार्थ्यानो चाईल्ड हेल्प लाईन -1098 चा वापर करा:-पि आय देविदास कठाडे

  कामठी: नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून बालक दिनानिमित्त कामठी रोड वरील दिल्ली पब्लिक स्कुल खैरी येथे जुनी कामठी पोलीस विभागाच्या वतीने छात्र पोलीस संकल्पने अंतर्गत “बाल हक्क व सुरक्षितता ‘विषयावर जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाडे यांनी विद्यार्थ्यांना बालकांचे हक्क व बालकाविरुद्ध अत्याचार तसेच अत्याचारांना प्रतिबंध करणे, बालकांवरील लैंगिक शोषणविरुद्धचे अत्याचार लपवून न ठेवता पोलिसांना त्वरित अवगत करणे तसेच बालकांच्या अत्याचाराच्या माहिती बाबत चाईल्ड हेल्पलाईन -1098 चा वापर करण्याचे मौलिक मार्गदर्शन केले.

  याप्रसंगी कार्यक्रमात उपस्थित नववितील विद्यार्थ्यांना शालेय शिस्त, रस्ते सुरक्षा , महिला सक्षमीकरण , सायबर क्राईम , इंटरनेट हाताळताना घ्यावयाची दक्षता , बालकांविरुद्ध हिंसा करण्यास प्रतिबंध करणे याबाबत सुद्धा जनजागृतीपर मौलिक मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेतील शालेय शिक्षकगण तसेच विद्यार्थिवर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.

  संदीप कांबळे कामठी


  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145