नागपूर: महान देशभक्त बिरसा मुंडा यांची १४४वीं जयंती आज शुक्रवार, दिनांक, १५ नोव्हेंबर रोजी नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात साजरी करण्यात आली. नामप्राविप्रचे अपर आयुक्त श्री. हेमंत पवार यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नासुप्रचे मुख्य अभियंता श्री. सुनील गुज्जेलवार, नासुप्रचे अधिक्षक अभियंता श्री. पी.पी. धनकर, नामप्रविप्राच्या नगर रचना विभागाचे उप-संचालक श्री. लांडे, कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी अभियंता (प्रकल्प) श्री. प्रशांत भांडारकर आणि आस्थापना अधिकारी श्री. योगीराज अवदूत तसेच इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
Advertisement

Advertisement
Advertisement