Published On : Tue, Oct 3rd, 2017

लॉयन्स,लॉयनेस क्लब कन्हान व्दारे विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी.

कन्हान : लॉयन्स, लॉयनेस क्लब कन्हान कोलसिटी च्या व्दारे उत्कर्ष प्रायमरी इंग्रजी शाळेच्या विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करण्यात आली.

विश्व सेवा सप्ताह ” अंतर्गत लॉयन्स, लॉयनेस क्लब कन्हान कोलसिटी व्दारे मंगळवार दि.३ऑक्टो.२०१७ ला सकाळी उत्कर्ष प्रायमरी इंग्रजी माध्यम शाळा हनुमान नगर कन्हान येथे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करून डॉ. व्ही एम जुनघरे व डॉ नाकतोडे हयानी शाळेच्या २०५ विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी केली. व क्लब तर्फे विद्यार्थ्याना बिस्कीट पॉकेट वितरण करण्यात आले.

शाळेच्या संचालिका नागपूरकर मँडमनी उपस्थित लॉयन्स, लॉयनेस क्लब च्या पदाधिका-यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या आरोग्य शिबीरास लॉयन्स क्लब कन्हान अध्यक्ष गोपिचंद ईखार,योग सप्रा, भगवान नितनवरे, लॉयनेस अध्यक्षा हेमलता जुनघरे, नगरसेविका वैशाली डोणेकर, सचिव भावना पोटभरे, आशा खण्डेलवाल, वनिता भिवगडे,हर्षाली गिरडकर, मंजु यादव तसचे शाळेतील शिक्षिका प्रामुख्याने उपस्थित होत्या.