Published On : Mon, Jul 29th, 2019

बालाजी कॉन्व्हेंट येथे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा विद्यार्थ्यांकडून संकल्प

Advertisement

नागपूर: बुटी बोरी येथील बालाजी कॉन्व्हेन्ट मराठी माध्यम मधील विद्यार्थी व शिक्षक यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्याचा उद्देशाने आज २०० वृक्षांची लागवड करण्यात आली .

या उपक्रमात जवळपास ३५० विद्यार्थी उपस्थित होते.बालाजी कॉन्व्हेन्ट च्या खाली जागेत २०० झाडांचे वृक्षारोपण करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला असून त्यात कडुलिंब,करंजी,चीचबली, चीच,सुबाभूळ,निलगिरी जास्वंद,आंबा, यासारख्या विविध प्रजातीच्या झाडांचा समावेश आहे.निव्वळ झाडे लावून जमणार नाही तर त्याचे संरक्षण आणि संगोपन हे देखील तितकेच महत्वाचे त्या करिता सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी दररोज त्या वृक्षाची काळजी घेतल्या जाईल याचा संकल्प करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी झाडे लावा,झाडे जगवा.,झाड देते सावली तिच माझी माऊली असा संदेश देत वृक्षसंर्वधनासाठी शाळा व स्वभोवतलच्या परिसरात जनजागृती करण्यात आली.व या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पर्यावरणातील वृक्षांचे महत्त्व व पर्यावरण समजावून दिले.

मराठी माध्यम चे मुख्यध्यापक निखिल साबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडण्यात आला.त्या करिता मराठी माध्यम चे शिक्षकवृंद तुषार सरोदे ,वैभव खोब्रागडे ,सपना खरड ,माधुरी केराम,नीतीन वाटमोडे ,रोहन तावरे व नितीन कुरई सर प्रामुख्याने उपस्थित होते.तर शाळेतील कर्मचारी गणेश ठाकरे,विनोद डोईफोडे,अतुल गावंडे , दुर्गेश कुराडे व प्रणीन वैद्य यांचा विशेष सहयोग लाभले.

संदीप बलवीर, बुटिबोरी, नागपुर