Published On : Mon, Jul 29th, 2019

स्मार्ट बुटीबोरीच्या स्वप्नाला खीळ!

Advertisement

नागपूर:-देशाचे पंतप्रधान यांनी स्वच्छतेचा मंत्र पुकारत स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेण्याचा संकल्प केला आहे.या अंतर्गत शासनाने रोगराईवर आळा घालण्यासाठी स्वच्छता किती महत्वाची आहे,याचे विविध योजनांतून प्रबोधनातून बाळकडू पाजले.तसे निर्देशही दिले.पण बुटी बोरी येथील समाजमन स्वच्छतेविषयी जागृत नाही.त्याच प्रमाणे येथील नगरपरिषद प्रशासनही स्वच्छतेबाबद गंभीर नसल्याबचे दिसून येते. म्हणून केंद्र सरकारने राबविलेले स्वच्छता अभियान केवळ कागदावरच असल्याचे चित्र नगरपरिषद बुटीबोरी येथे पहावयास मिळत आहे.

स्वच्छ भारत, सुंदर शहर अशा घोषणा ऐकल्यानंतर समाधान वाटते. पण प्रत्यक्षात बुटीबोरी शहरात स्वच्छता आहे, का असा प्रश्न शहरातील अस्वच्छता पहिल्यानंतर वाटते.शहरामध्ये स्वच्छ भारत योजना राबविण्यात येत आहे. पण त्याला सुरुंग लावण्याचे काम येथील नागरिकच करत आहेत. रिकामी जागा दिसली की टाका कचरा अशी परिस्थिती सध्या शहरात आहे.बुटीबोरी शहरात प्रवेश करतांनाच मुख्य वळणावर कचर्यानेच स्वागत होते आहे.रस्त्यालगत कचऱ्याचे ढिगारे,रोड वरून वाहणारे पाणी,उघडी गटारे,पसरलेली दुर्गंधी,डासांचा प्रादुर्भाव असे जागोजागी दिसणारे चित्र जर शहराच्या प्रवेशद्वारा सोबत शहराच्या मुख्य चौकात हे हाल आहे तर उर्वरित शहरात काय अवस्था असू शकते याचा अंदाज बांधता येण्याजोगा आहे. त्यामुळे स्वच्छ भारत मिशन योजनेची अंमलबजावणी बुटीबोरी मध्ये होताना दिसत नाही. या ठिकाणी कचऱयाचे साम्राज्य पसरले आहे. याकडे नगरपरिषद लक्ष देणार का..?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकेकाळी बुटीबोरीला स्मार्ट नगर बनविण्याचे स्वप्न बघणाऱ्या प्रशासना बरोबर येथील माणूस देखील स्मार्ट होईल का….? शहर स्मार्ट होईल पण माणूस कधी स्मार्ट होणार ? याचा प्रत्यय या मार्गावर दिसून येतोे.बुटीबोरी शहराच्या प्रवेश द्वारावरच अगदी लागून पोलीस ठाण्याची संरक्षण भिंत आहे.या मार्गावर अवैध पार्किंग चा विळखा तर आहेच शिवाय या अवैध पार्किच्या आडोशाला पुरुष लघुशंका करतात.बस स्थानक जवळ असल्यामुळे या ठिकाणी महिला,पुरुष, शाळा कॉलेज चे विद्यार्थी मुले मुली अश्या हजारोंची येथून वर्दळ असते.सतत च्या वाहत असलेल्या दुर्गंधी मूळे रहदारी करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.महिलांना तर खाली मान टाकूनच येथून मार्गक्रमण करावे लागते.बुटीबोरी शहर हे देशातील औद्योगिक शहर म्हणून गणल्या जाते.परिसरातील मोठी बाजारपेठ म्हणून या ठिकाणी हजारो लोकांची नेहमी वर्दळ असते.बुटीबोरीच्या मुख्य मार्गावर नगर परिषदेने सुलभ शौचालयाची व्यवस्था करावी असी मागणी येथील नागरिक करीत आहे.पुरुष आपल्या निगरगठ्ठ स्वभावामुळे त्यांच उघड्यावर भागून जात पण महीलांकरिता फजितीची बाब आहे.

नुकत्याच येथील नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या.यामध्ये भाजप चा झेंडा नगर परिषदेवर फडकला.बुटीबोरीच्या विकास कामाकरिता पाच कोटी चा निधी मंजूर झाला.ज्वलंत समश्या बरोबर कोणत्या समश्यांना प्राथमिकता दिली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

संदीप बलवीर, बुटिबोरी, नागपुर