Published On : Thu, Aug 8th, 2019

विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिला जागतिक स्तनपान सप्ताह कार्यक्रमाचा संदेश

शासकिय उपजोल्हा रुग्णालयात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा

कामठी : बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी तसेच बालमृत्यूचे वाढलेले प्रमाण रोखण्यासाठी 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालकांसाठी स्तंनपाणाचे महत्व आहे यासाठी जागतिक पातळीवर 1 ते 7 ऑगस्ट हा स्तनपान सप्ताह साजरा केला जातो यानुसार येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात जागतिक स्तनपान सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

याप्रसंगी आश्रम स्कुल अँड कॉलेज ऑफ नर्सिंग च्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून स्तनपान हे बालमृत्यू रोखण्यासाठी प्रभावी साधन असून जागतीक स्तनपान सप्ताह कार्यक्रमाचा संदेश दिला.

याप्रसंगी शासकिय उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिक्षिका डॉ श्रद्धा भाजीपाले, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रतिभा कडू, कविता शंभरकर, डॉ शीतल गजघाटे, वृक्षाली शिरस्कर, वर्षा वानखेडे, सविता मोफकर ,तसेच परिचारिका गण व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी वर्गासह आश्रम स्कुल अँड कॉलेज ऑफ नर्सिंग चे प्राचार्य सुमती देवधर, उपप्राचार्य एम लक्ष्मी यासह विद्यार्थिवर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी