
कामठी: नवजात शिशूला सुरुवातीचे चीक दूध म्हणजे कोलस्ट्रम दिले जाते तेच बाळाचे पहिले लसीकरण आहे कारण त्यात अँटि बायटीड असतात .आईचे दूध म्हणजे बाळासाठी अमृतच आहे असे मौलिक प्रतिपादन तालुका आरोग्य अधिकारि डॉ अश्विनी फुलकर यानो व्यक्त केले. येथील कामठी नगर परिषद नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित जागतिक स्तनपान सप्ताह कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले.
तर प्रसूती नंतर एक तासाच्या आत स्तनपान नवजात शिशूला दिले तर त्याला नवसंजीवनी प्राप्त होते व स्तनपान केल्याने स्तनदा मातेला भविष्यात गर्भाशयाचा किंवा स्तनाच्या कॅन्सर चा धोका उरत नाही , प्रकृती चांगली राहते असे समयोचित मार्गदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी यांनी व्यक्त केले याप्रसंगी सिस्टर मेंढे, तिजारे,रंजना कवरती, शुभांगी भोकरे, सुषमा दिवांगी, सीमा नगरारे, स्वाती वाघमारे, कोमल जवादे, स्वीटी रामटेके, तसेच विशाल माटे, राजू कुरकुडे, अनिल नान्हे प्रामुख्याने उपस्थित होते.