कामठी: पावसाळा तोंडावर असताना आज 3 जून ला दुपारी 3 ते साडे तीन दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्याचा तडाखा कामठी तालुक्यातील केम गावाला चांगलाच पडला असून गावातील तसेच शेतातील लोंबकलेल्या विद्दूत ताराचे 23 विद्दूत खांब पडले ज्यामुळे विद्दूत पुरवठा बंद झाला होता तसेच सुसाट वादळी वाऱ्याने कित्येक झाडे पडले तर झाडावर कसाबसा जीव वाचवून बसलेले पोपट यासारखे पक्षी सुद्धा मरण पावले तसेच गावातील कित्येक ग्रामस्थांच्या घरावरील टिनाचे छत , घरावरील कौल तसेच टिनाचे शेड उडाले काही काळ क्षणार्थ परिस्थिती विस्कळीत झाल्याने ग्रामस्थात भीतीमय वातावरण निर्माण झाले होते.तर तब्बल अर्ध्या तासाच्या आत हा वादळी वारा थांबल्या नंतर ग्रामस्थानी मोकळा श्वास घेतला.
या वादळी वाऱ्याने खंडित वीजपुरवठा पूर्ववत रित्या सुरू करण्यासाठी ग्रा प उपसरपंच अतुल बाळबुधे यांनी संबंधित महावितरण अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधून पडलेले खांब पूर्ववत रित्या करून खंडित वीजपुरवठा सुरू करण्यासाठी कामाला गती देण्यात आली.मात्र आजच्या या वादळी वारा तसेच विजेचा कडकडाट मुळे ग्रामस्थात एक प्रकारचे भीतीमय वातावरणच निर्माण झाले होते.तर पावसाळा तोंडावर असून पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती चा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने नियोजन करणे अति गरजेचे आहे.
– संदीप कांबळे कामठी