Published On : Mon, Jun 3rd, 2019

अवैधरित्या मुरूम चोरीच्या ट्रकवर तहसीलदार ची कारवाही ,

Advertisement

कामठी: विनापरवाना अवैधरीत्या मुरमाची चोरी करून जात असलेला ट्रक कामठी चे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी रवीवारला सायंकाळी सात वाजता सुमारास गुमथळा परिसरातील पकडून दोन लाख 21 हजार रुपयांचा दंड वसूल केल्याची कारवाई केली त्यामुळे अवैध रेती तस्कर व मुरुम चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

प्राप्त माहिती नुसार भोला शोभाराम सुर्यवंशी वय 30 राहणार बिछवाकुल ता,जुनरदेव, जिल्हा छिंदवाडा, मध्यप्रदेश याने कन्हान येथी ल खाजगी मालकाचा ट्रक क्रमांक MH 40 N 6442 मंडई बिनापर्वाना ऐवधारीत्या नगरधन तालुका रामटेक येतून शासकीय जमिनीतून 4 ब्रास भरुन कामठी तालुक्यातील गुमथळा येथील कॅनलच्या कामासाठी खाजगी कंत्राट दाराकडे घेऊन जात असताना रविवारला सांयकाळी 7 वाजता सुमारास कामठी चे तहसीलदार अरविद हिंगे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सापळा रचून मुरूम भरले ला ट्रक पकडला असता ट्रक मध्ये 4 ब्रास मुरूम मिळून आला सदर ट्रक चालकांवर माहाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 चे कलम 48/7 नुसार कारवाई करून 2 लाख 21 हजार 600 रुपये दंड वसूल केला त्यामुळे कामठी तालुक्यातील रेती व मुरूम तस्कराचे धाबे दणाणले आहेत वरील कारवाई तहसीलदार अरविंद हिंगे , अमोल पोळ, शेख बाबू, युवराज चौधरी यांनी केली.

– संदीप कांबळे कामठी