Published On : Mon, Jun 3rd, 2019

साटक येथे कृषी मार्गदर्शन सभा संपन्न

कन्हान: महाराष्ट्र शासन कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी कार्यालय पारशिवनी यांच्या व्दारे संपुर्ण तालुक्यात रोहिणी नक्षत्र पंधरवाडा कालावधीत कृषी विभागामार्फत खरिब हंगामात राबविण्यात येणा-या शासकीय विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे . याच अनुसंगाने पारशिवनी तालुक्यातील कन्हान मंडळ अंतर्गत येणा-या साटक येथे नुकतीच शेतकरी सभा सरपंचा सौ सिमाताई यशवंतराव उकुंडे , तालुका कृषी अधिकारी श्री जी बी वाघ, कृषी सहाय्यक के बी ठोंबरे , मार्गदर्शक जी बी भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली . कृषी सभेत शासकीय विविध योजना , पेंच पाणी व्यवस्थापन, ” श्री ” पध्दतीचे धान लागवड, ३७ मिंगच्या बीज प्रक्रियेचे प्रात्याक्षिक तसेच सभेदरम्यान शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मार्गदर्शन करण्यात आले. या सभेला गावातील प्रगतशिल व इतर शेतकऱ्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घेतला .