Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Aug 3rd, 2018

  पेंच धरणाचे पाणी मिळण्या करिता शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन.

  कन्हान : – नागपुर – जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील अण्णा मोड डुमरी येथे शेतकरी, शेतमजुर संघर्ष समिती पारशिवनी , रामटेक, मौदा तालुका च्या वतीने परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यानी धान लावणी (रोहणी) व धान पिकाकरिता पेंच धरणाचे पेंच कालव्याने पाणी देण्याच्या मागणी करिता रास्ता रोको आंदोलन करून उपविभागीय अधिकारी रामटेक मा राम जोशी हयाना निवेदन देऊन त्वरित पाणी देऊन शेतकरी जगवा अशी आग्रही मागणी केली आहे .

  निसर्गाने दंडी मारल्याने पारशिवनी, रामटेक, मौदा परिसरातील धान रोहणीचे ( लावण्याची ) कामे थांबल्याने शेतकरी चिंतातुर झाल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांनी पेंच धरणाचे पाणी धान पिकाकरिता मिळण्यासाठी शुक्रवार ( दि.३) ऑगस्ट ला सकाळी ११वाजता नागपूर – जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील अण्णा मोड डुमरी येथे शेतकरी, शेतमजुर संघर्ष समिती पारशिवनी , रामटेक, मौदा तालुका च्या वतीने परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यानी धान पिका करिता पेंच धरणाचे पेंच कालव्याने पाणी देण्यात यावे या करिता रास्ता रोको आंदोलन करून उपविभागीय अधिकारी रामटेक मा राम जोशी हयाना निवेदन देऊन त्वरित पाणी देऊन शेतकरी जगवा अशी कडकडीची आग्रही मागणी केली.

  ” पेंच धरणाचे पाणी शेतकऱ्याच्या हक्काचे , नाही कुणाच्या बापाचे “. घोषणा करण्यात आल्या . या प्रसंगी जिवन मुंगले, रमेश कारेमोरे , माजी मंत्री राजेंद्र मुळक, व्यकंट वाकुलकुंडी , किशोर बेलसरे, दयाराम भोयर, रामनाथ यादव, सुर्यभगवान भास्कर रेड्डी, कैलास खंडाळ, योगेश वाडीभस्मे, देवाजी ठाकरे , संदीप यादव, संजय सत्येकार, राजु भोस्कर, पवन काठोके, राहुल वानखेडे , प्रशांत ठाकरे प्रामुख्याने उपस्थितीत राहुन रास्ता रोको आंदोलन करून आग्रही मागणी केली . आंदोलन स्थळी मा राम जोशी उपविभागीय अधिकारी रामटेक, वरूण सहारे तहसिलदार पारशिवनी , प्रेमकुमार आडे नायब तहसिलदार, शाखा अभियंता मोरघडे स्थितीत राहुन शेतकऱ्याची समस्या समजावून घेतल्या.

  पोलीस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे, थानेदार चंद्रकांत काळे हयानी चोक बंदोबस्त लावुन परिस्थीती नियंत्रणात ठेवली . व कलम ३४१, १४३, १४९, भादंवि मु पो का नुसार कारवाई करून जिवन मुंगले, रमेश कारेमोरे , घनश्याम निबोंणे, सुर्यभगवान सुब्रमण्यम, प्रकाश भोयर, श्रीनिवास सुब्रमण्यम, मुकेश यादव, सुरजलाल जामखुरे, राहुल वानखेडे , श्रीकांत बावनकुळे , भाऊराव कोकाटे , साब्या बोरबटे आदी शेतकऱ्यांना अटक करून सोडण्यात आले .
  . . मध्य प्रदेशातील नविन बनलेल्या चौराई धरणामुळे मागील वर्षी पेंच धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध न झाल्याने पेंच धरणाचे पाणी सोडण्यात न आल्याने तसेच निसर्गाने सुध्दा दंडी मारल्याने परिसरातील धान उत्पादक शेतकरी धान पिकांचे उत्पादन घेऊ शकले नाही . या वर्षी सुरूवातीच्या पावसाने पेंच धरणात जलसाठा व्यवस्थित होत आहे .

  या वर्षी ऐन रोहणीच्या वेळेवर निसर्गाने (पावसाने) दंडी मारल्याने पारशिवनी, रामटेक, मौदा परिसरातील धान रोहणीचे कामे थांबल्या आहे . करिता पेंच कालव्याचे पाणी सोडण्यात येऊन धान उत्पादक शेतकऱ्यांना व लोकांना जगवा अशी कडकडीची मागणी लक्ष्मण खंडाळ, देविदास जामदार, रामभाऊ ठाकरे , रामभाऊ धोटे , राजेंद्र महाले , पुरुषोत्तम ठाकरे , पुरुषोत्तम हिवसे , गज्जु लेकुरवाळे, प्रकाश भोयर, सचिन खंडाळ, शुभम झाडे , अजय इंगोले , ईश्वर हारोडे, गुलाब सोनवाने , गणेश कोकाटे, यशवंतराव नेऊल, अजित मंगर, चंद्रभान वानखेडे , धर्मराज खडसे , दिलीप बंड, दिंगाबंर खेरगडे, भिमराव काकडे , देवचंद देमदे , सुनील दारोडे , देवराव बालकोटे, महावीर पु-हे, चिरकुट बांगरे , पिंटु नितनवरे , अनिल राऊत, खालीद अहमद, सुरेश हेटे, दिनेश सातपुते , रोशन ढोमणे , अर्जुन ऊके , पांडुरंग शेळके , रविंद्र बागडे , किशोर ठाकरे , धर्मेद्र रच्छोरे , प्रभाकर बोराडे सह परिसरातील मोठय़ा संख्येने धान उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थितीत होऊन धान लावणी , धान पिकाकरिता पाणी सोडण्याची मागणी केली आहे .


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145