Published On : Tue, Jun 16th, 2026
By Nagpur Today Nagpur News

चंद्रपूर महापालिका काँग्रेस गटात खळबळ; गटनेते राजेश अडूर पदमुक्त, सुरेंद्र अडबाले यांची निवड!

Advertisement

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका काँग्रेस गटात मोठी राजकीय घडामोड घडली असून गटनेतेपदात बदल करण्यात आला आहे. काँग्रेसच्या २७ नगरसेवकांपैकी १६ नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विद्यमान गटनेते राजेश मुरली अडूर यांना पदमुक्त करण्यात आले असून त्यांच्या जागी सुरेंद्र विठ्ठलराव अडबाले यांची नव्या गटनेतेपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

या संदर्भात बैठकीला उपस्थित असलेल्या १६ नगरसेवकांनी विभागीय आयुक्त, नागपूर यांना निवेदन सादर करून महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ व नियम १९८७ अन्वये झालेल्या बदलांची अधिकृत नोंद घेण्याची मागणी केली आहे.

Gold Rate
Aug 3 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,400 /-
Gold 22 KT ₹ 1,33,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मिळालेल्या माहितीनुसार, १० जून रोजी गटातील सर्व २७ सदस्यांना १५ जून रोजीच्या बैठकीची नोटीस देण्यात आली होती. १६ सदस्यांनी नोटीस स्वीकारून पोच दिली, तर उर्वरित सदस्यांना व्हॉट्सअॅपद्वारे सूचना पाठविण्यासह त्यांच्या निवासस्थानी नोटीस चिटकविण्यात आली होती.

१५ जून रोजी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत उपस्थित सदस्यांनी एकमताने तीन महत्त्वाचे ठराव मंजूर केले. यामध्ये राजेश अडूर यांना गटनेतेपदावरून हटविणे, सुरेंद्र अडबाले यांची नवीन गटनेते म्हणून निवड करणे आणि काँग्रेस गटाचा अधिकृत पत्ता प्रतिभाताई धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा निश्चित करणे यांचा समावेश आहे.

Advertisement

या घडामोडीमुळे चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला नवे वळण मिळाले असून आगामी काळात या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
"पहले भगवान को जोड़े हाथ... फिर उड़ाया चांदी का मुकुट और मंदिर की घंटी!  #NagpurNews #TempleTheft

"पहले भगवान को जोड़े हाथ... फिर उड़ाया चांदी का मुकुट और मंदिर...

पंकजा मुंडे भाजपा छोड़ें; वडेट्टीवार की अपील #vidarbhanews  #nagpur #newsupdate #vidarbha

पंकजा मुंडे भाजपा छोड़ें; वडेट्टीवार की अपील #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha

Nagpur: नाबालिग छात्रा से दुष्कर्म का आरोप #nagpurnews #Crime #POCSO  #LatestNews #CityNews #Justice

Nagpur: नाबालिग छात्रा से दुष्कर्म का आरोप #nagpurnews #Crime #POCSO #LatestNews #CityNews...

शादी का झांसा देकर युवती से दुष्कर्म #Nagpur #NagpurNews #CrimeNews #NagpurPolice #NewsUpdate

शादी का झांसा देकर युवती से दुष्कर्म #Nagpur #NagpurNews #CrimeNews #NagpurPolice #NewsUpdate

नागपूर महापालिकेच्या मुख्यालयात 'दारू पार्टी'; शहर चालवणाऱ्या कार्यालयात नेमकं चाललं तरी काय?

नागपूर महापालिकेच्या मुख्यालयात 'दारू पार्टी'; शहर चालवणाऱ्या कार्यालयात नेमकं चाललं तरी काय?

मिलावटी खाद्य पदार्थों पर सख्त कार्रवाई जारी #vidarbhanews #amravati #newsupdate  #nagpurnews

मिलावटी खाद्य पदार्थों पर सख्त कार्रवाई जारी #vidarbhanews #amravati #newsupdate #nagpurnews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges