Published On : Tue, Jun 16th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरात शिंदेच्या शिवसेनेला बळ; नितीन तिवारींसह अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश

Advertisement


नागपूर : नागपूरमधील युवा सामाजिक-राजकीय कार्यकर्ते नितीन तिवारी यांनी समर्थक आणि सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील उपमुख्यमंत्री निवासस्थानी पार पडलेल्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश पार पडला.

गेल्या दीड दशकापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले नितीन तिवारी यांनी यापूर्वी युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख, शिवसेना शहर समन्वयक आणि शहर प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. कचरा प्रश्नावर आंदोलन, लर्निंग लायसन्स घोटाळ्याविरोधातील आंदोलन यासह अनेक जनआंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.

कामगार, बेरोजगार युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत जनहिताच्या मुद्द्यांसाठी संघर्ष केल्याचे तिवारी यांनी सांगितले.

Gold Rate
Sept 24,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पक्षप्रवेशानंतर बोलताना नितीन तिवारी म्हणाले, “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि एकनाथ शिंदे यांच्या जनसेवेच्या भूमिकेने प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. समाजातील वंचित, गरीब आणि गरजू घटकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी काम करत राहणार.”

“राजकारण हे केवळ सत्तेचे माध्यम नसून समाजकारणाचे प्रभावी साधन आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी संघर्ष आणि संघटन मजबूत करण्याचे काम यापुढेही सुरू राहील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

यावेळी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये आशिष हाडगे (शहर युवा अधिकारी, युवासेना), भूपेंद्र कठाने (शहर संघटक, कामगार सेना), अब्बास अली (जिल्हा चिटणीस, युवासेना), कार्तिक करोसिया (कंत्राटी रेल्वे युनियन अध्यक्ष), ललित बावनकर (शहर संघटक, वाहतूक सेना), कमलेश त्रिपाठी (कामगार युनियन अध्यक्ष), आकाश शिर्के (विधानसभा संघटक, युवासेना उत्तर नागपूर), मुन्ना तिवारी (शहर सचिव), तोरेन हिरौंदे (विभाग प्रमुख, शिवसेना पूर्व नागपूर), शोहेब कुरेशी (विभाग संघटक, युवासेना) यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.

नितीन तिवारी यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत संघटना आणि समाजासाठी पूर्ण निष्ठेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.