Published On : Tue, Mar 3rd, 2020

भापती पदाची सभा रद्द

कन्हान : नगरपरिषद कन्हान-पिपरी सभापती पदाची निवडणूक दोन मार्च सोमवार रोजी नगरपरिषदेच्या सभागृहात ठेवण्यात आली होती. जिल्हाधिकारी नगर प्रसाशन विभाग कार्यालयाच्या सभेच्या नोटीस नुसार नियमाप्रमाणे सभापतीचे फॉर्म सभेच्या बैठकीच्या वेळेच्या दोन तास आधी भरणे अनिवार्य होते सभेचा वेळ १ वाजता असून फॉर्म भरण्याचा वेळ ११ वाजता होता त्या नुसार महिला बालकल्याण सभापती साठी रेखा टोहणे व सार्वजनिक बांधकाम विभागा साठी सुषमा चोपकर यांनी ११ वाजताच्या पूर्वी मुख्यधिकारी जवळ फॉर्म भरले होते तर इतर फॉर्म ११ वाजता नंतर भरण्यात आले होते ज्याच्या वेळाची नोंद मुख्यधिकारी यांनी रीतसर केली.

Advertisement

सभेच्या वेळेवर पीठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी रामटेक सभागृहात न येता व निवडणूक प्रक्रियेची कुठलीही माहिती न देता सभा रद्द करण्यात आली आहे असे मुख्यधिकारी यांच्या वतीने सांगण्यात आले असून ते नियम बाहय आहे अशाच प्रकार मागील वर्षी सभेत विषय समितीच्या सभापतीचे फॉर्म नोटीस नुसार दिलेल्या वेळेवर सादर न केल्याने अवैध ठरविण्यात आले होते हे लक्षात घेता या वर्षी सभापतीचे फॉर्म ११ वाजता पूर्वी सादर करण्यात आले. सभा रद्द करण्याचे कारण विचारले असता जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले म्हणून सभा रद्द करण्यात येत आहे असे मुख्यधिकारीने उपस्थित सदस्यांना सांगितले.

Advertisement


झालेला प्रकार नियम बहाल असून सभापती पद करिता ११ वाजता पूर्वी आलेल्या फॉर्म वैध ठरवून नियमानुसार निकाल घोषित करण्यात यावे व असे न झाल्यास न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली जाणार असे पत्रकार परिषदेत डॉक्टर मनोहर पाठक व गट नेता राजेंद्र शेंद्रे यांनी संघीतले प्रसंगी वर्षा लोंढे, सुषमा चोपकर, अनिता पाटील, संगीता खोब्रागडे रामेश्वर शर्मा, शैलेश शेळके, मनोज कुरडकर, नगरसेवक, पत्रकार, कार्यकर्ता उपस्थित होते. अधिक माहिती साठी मुख्यधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

Advertisement

राजकारणाचे बळी पडल्याने झाली नगरसेवकांची गोची
जिंकून आलेल्या नगरसेवकांमध्ये अधिक उत्साह असून अनेकांनी महाविकास आघाडीच्या ठळविण्या आल्या प्रमाणे आपण सभापती बनणार आहो असे गृहीत धरून नगरपरिषद बाहेर बंड बाजा व नातेवाहिकांना बोलविले होते मात्र राजकारणाच्या बळी पडल्याने त्यांची गोची झाली असल्याने नगरिकांन मध्ये हास्यास्पद वातावरण आहे.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement