Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Mar 3rd, 2020

  कन्हान नगरपरिषदेच्या विषय समिती च्या निवडणुकीत गैरव्यवहाराचा आरोप

  कन्हान: – सोमवार ला झालेल्या कन्हान-पिपरी नगरपरिषदेच्या विषय समिती निवडणुकीची विशेष सभा पिठाशीन अधिकारी हयानी पुर्ण न करता रद्द करण्यात आल्याने विरोधी पक्ष गटनेता राजेंद्र शेंदरे सह नगरसेवकांनी विशेष समितीच्या निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला.

  सोमवार (दि.२) ला कन्हान-पिपरी नगरपरिषदेच्या विशेष समितीच्या निवडणुकीची प्रकिया १० वाजता सुरू झाली असुन विरोधी पक्षाच्या सौ सुषमा चोपकर यांचा बांधकाम सभापती करिता व कॉग्रेसच्या रेखा टोहणे महिला बाल कल्याण सभापती करिता यांचा ११ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यात आला तर भाजपत्या संगिता खोब्रागडे यांचा आरोग्य व स्वत्छता सभापती करिता ११.०६ मिनीटानी अर्ज दाखल केला. त्यानंतर सत्ता पक्षाचे अर्ज दाखल करण्यात आले.

  दुपारी एक वाजता विशेष सभेस्थळी पिठाशीन अधिकारी मा जोगेंद्र कटियारे उपविभागीय अधिकारी रामटेक न येता प्रोसीडींग अधिकारी सतिश गांवडे मुख्याधिकारी हयाना पाठवुन विशेष सभा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आल्याने विरोधी पक्षाकडुन विचारणा केली असता कुठलेही सबळ कारण न देता मा जिल्हाधिकारी नागपुर यांच्या आदेशाने विशेष सभा रद्द करण्याचे मौखिक सागण्यात आल्याने कन्हान नगर विकास आघाडीचे गटनेता व नगरसेवक हयांनी मा जिल्हाधिकारी नागपुर यांचे कडे धाव घेऊन कन्हान नगरपरिषदेच्या विषय समिती च्या निवडणुकीत गैरव्यवहाराचा आरोप तसेच महा. शासनाचे नगरविकास विभागाचे शासन निर्णय क्र बीएनएम/५००५/४६प्र क्र ७( भाग ३ ) क)/ नवि३२ दि. २२/१२/२००६ नुसार विषय समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी बोलविलेली विशेष बैठक २/३ अन्वये रद्द करता येत नाही किंवा तहकुब करता येत नाही असे असताना सुध्दा सभा रद्द करण्यात आली.

  तसेच पिठाशीन अधिका-यांनी ११ वाजता नंतर सभापती पदाकरिता आलेले नामाकंन रद्द करून अवैध ठरवुन ११ वाजता पर्यंत आलेले नामाकंन वैध ठरवुन निवडणुक प्रकिया घेण्यात यावी व बांधकाम सभापती व महिला बाल कल्याण सभापती बिनविरोध निवडुन आल्याचे घोषीत करावे. अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली . पत्रपरिषेदत कन्हान नगर विकास आघाडीचे गटनेता राजेंद्र शेंदरे, माजी उपाध्यक्ष मनोहर पाठक, नगरसेविका सुषमा चोपकर, अनिता पाटील, वर्षा लोंढे, सौ. संगीता खोब्रागडे, वंदना कुरडकर, कामेश्वर शर्मा, राजेश पोटभरे, सुनील लाडेकर, ऋृषभ बावनकर, शैलेश शेळके, अमिश रूंघे, अजय लोंढे, मनोज कुरडकर, संजय चोपकर प्रामुख्याने उपस्थित होते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145