Published On : Tue, Mar 3rd, 2020

मनसर येथे प्लॅस्टिक मुक्त अभियान.

Advertisement

रामटेक : मनसर दि 29, वार्ताहर :- ग्राम पंचायत मनसर येथे आज सकाळी प्लॅस्टिक मुक्त जिल्हा ” पर्यावरणाशी नाते जोडा ” या अभियानाअंतर्गत सिंगल युज प्लॅस्टिक बंदी, जनजागृती आणि श्रमदान कार्यक्रम संपूर्ण मनसर गाव परिसरात ग्राम पंचायत कार्यालय मनसर येथून सकाळी 10 ते दुपारी 2 वा.

पर्यंत राबविण्यात आला, यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर संजय यादव यांनी सदर कार्यक्रम निरंतर 2 वा. पर्यंत राबविण्यात यावे असे सांगितले. दुपार पर्यंत जास्तीत जास्त ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग नागपूर अनिल किटे, जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे, पं. स. सभापती कला ठाकरे, पं. स. गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले, सरपंच योगेश्वरी हेमराज चो कांद्रे उपसरपंच चंदू नगरे, ग्रा. पं. सदस्य नंदकिशोर चंदनखेडे, संतोष बोरीकर, राजू रामटेके, दुर्गेश नायडू, आम्रपाली नगरकर, स्वरूपा चौधशी, सीमा गजबेस, ग्राम विकास अधिकारी जिवन देशमुख, रामटेक तालुक्याचे इतर ग्राम सेवक, कर्मचारी, ग्रा पं कर्मचारी विलास मडावी, पिंटू कुवारे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.