Published On : Fri, Apr 30th, 2021

भाजपा आदिवासी आघाडीच्या शिष्टमंडळा तर्फे मुख्यमंत्र्याना निवेदन

आदिवासी बांधव खावटी अनुदानापासून वंचित…
आदिवासी समाज बांधवाचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Advertisement

महाविकास आघाडी सरकार ने घोषित केलेल्या खावटी योजनेचे अनुदान रोख रक्कम तात्काळ महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) बांधवांच्या खात्यामधे जमा करण्या बाबत रविंद्र ठाकरे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना दिले. भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी नागपुर शहरा तर्फे निवेदन देण्यात आले. संपूर्ण देशात कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्च २०२० पासुन टाळेबंदी लागू करण्यात आली होती. या काळात सर्व कामे बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्या, कसाबसा उदरनिर्वाह करण्याऱ्या अनुसुचित जमातीच्या कुटुंबांच्या रोजगाराच्या प्रश्न निर्माण झाला होता.

Advertisement

या आपत्कालीन परिस्तिथित तातडीची मदत म्हणुन १९७८ पासुन सुरु झालेली, पण २०१३-१४ पासुन बंद असलेली खावटी योजना पुनर्जीवित करण्यात आली. मात्र टाळेबंदी संपुन दुसऱ्या टाळेबंदीची सुरुवात झाली असुन सुद्धा अनुसूचित जमातीतील नागरिकांना खावटी अनुदाना पासुन वंचित ठेवण्यात आल आहे. लॅाकडाऊनच्या काळात कामे बंद असल्यामुळे अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयासमोर बेरोजगारीच्या प्रश्न निर्माण झाला आहे.

Advertisement

आदिवासी कुटुंबाची उपासमार होऊ नये म्हणुन आदिवासी विकास विभागाने खावटी देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार ने घेतला होता. १ मे रोजी आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी खावटी देण्याची घोषणा केली होती. ९ सप्टेंबर रोजी त्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला. खावटी अनुदान योजने अंतर्गत आदिवासी कुटुंबांना ४ हजार रुपये अनुदान वर्षभरासाठी देण्यात येणार होते. यात २ हजार रूपये रोख व २ हजार रूपये वस्तुंच्या रुपात मिळणार होते. त्यासाठी ४८६ कोटी रुपयांची तरतुदीस मान्यता देण्यात आली होती.

नंतर सरकारने वस्तु स्वरुपात मदत न देता संपूर्ण खावटीची रक्कम रोख स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला.शासन आदिवासींच्या बाबतीत गंभीर नसल्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीला एवढा काळ लोटुनही आता पर्यंत नागरीकांना लाभ मिळाला नाही. शासनाचे या विषयाची बाब लक्षात घेता तात्काळ खावटी अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट खात्याला जमा करण्यात यावी अन्यथा संघटन व समाज बांधवा तर्फे शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. शिष्टमंडळात शहर अध्यक्ष रविंद्र पेंदाम, भाजपा शहर उपाध्यक्ष विवेक नागभिरे, आकाश मडावी अध्यक्ष पश्चिम नागपुर, स्वप्निल वलके अध्यक्ष दक्षिण-पश्चिम नागपुर , शिवराम वाढवे उत्तर नागपुर अध्यक्ष उपस्तिथ होते.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement