Published On : Tue, Sep 29th, 2020

चौहान यांच्या नेतृत्वाखाली महानगर पालिका निगम आयुक्त यांना निवेदन

Advertisement

नागपूर –

मनसे महिला सेनेच्या वतीने एकीकडे बेटी बचाओ अभियान अंतर्गत मुलींचा सन्मान वाढविण्याचा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र महिलांच्या आंतरवस्त्रांच्या आक्षेपार्ह प्रदर्शनावर बंदी आणण्यासाठी कुणी समोर येत नसून महिलांच्या आत्मसन्माला ठेच पौहचविण्याचा प्रयत्न आपल्या दुकानाची मार्केट्टिंग करण्यासाठी कपडा व्यापारी करीत असल्याने महिलांचा सन्मान हा सर्वांपरी असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या नागपूर शहर उपाध्यक्षा कल्पना चौहान यांनी या विरोधात आक्षेप घेत महिलांच्या आंतरवस्त्रांच्या आक्षेपार्ह प्रदर्शनावर त्वरित बंदी घाला अन्यथा आम्ही मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा नागपूर महानगर पालिका निगम आयुक्त व पोलिस आयुक्त यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

Advertisement

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेने तर्फे नागपूर उपशहर अध्यक्षा कल्पना चौहान यांच्या नेतृत्वाखाली नागपूर महानगर पालिका निगम आयुक्त, पोलिस आयुक्त तसेच सर्व सहाय्यक आयुक्त, सर्व मनपा झोन व सर्व पोलिस स्टेशन सहा. पोलिस निरिक्षक यांना निवेदन देण्यात आले असून शहराच्या हद्दीत असलेल्या विविध कापड व्यावसायिक जसे माॕल मधील कापड शोरूम, होजियरी दुकानदार, रस्त्याच्या कडेला शहरात वाढलेले ड्रेस मटेरियल विकणारे दुकानदार आदिंकडून महिलांचे आंतरवस्त्र विक्री करतांना नियम धाब्यावर बसवून प्लास्टिक, मेटल किंवा इतर मटेरियल पासून महिलांच्या आकाराचे अर्धकृती अथवा पुर्णकृती पुतळे वापरून त्यांचेवर सदर आंतरवस्त्र परिधान करून दुकानाबाहेर, रस्त्यावर टांगलेले किंवा उभारलेले दिसत आहेत.

तसेच सदर वस्त्रांच्या विक्रिसाठी जाहिरातीत वापरल्या जाणाऱ्या नट-नटींचे आंतरवस्त्रचित्रे कार्डबोर्ड, फ्लेक्सवर उतरवून व्यावसायिक स्वतःच्या आस्थापनांसमोर लावून महिलांच्या अब्रूचे धिंडवडे काढित आहे. अशा दुकानदार व माॕल व्यावसायिकांना पैसा कमावतांना महिलांचा आदर करायचा विसर पडलेला दिसत असून, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना हे खपवून घेणार नसून या नंतर जर नियमांचा आधार घेऊन शहरातील सर्व लहान-मोठ्या कापड व्यावसायिकांना या प्रदर्शनी बंद पुढील सात दिवसात बंद झाल्या नाही तर व कपडा आस्थापना धारकांनी दुकानाबाहेर अशी आक्षेपाह्य आंतरवस्त्र परिधान पुतळे, कटआऊंट्स अथवा फ्लेक्स वापरल्यास महिला सेना कायदा हातात घेऊन व्यावसायिकाचे तोंडाला काळे फासून आक्षेपाह्य पुतळ्याचे दहन करेल.

ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिगडल्यास सदर दुकानदार व त्यांचेवर नियंत्रण ठेवणारी महानगर पालिकेचा आस्थापना विभाग जबाबदार राहील. याची आपण नोंद घ्यावी.असा इशारा देण्यात आला याप्रसंगी शहर उपाध्यक्षा कल्पना चौहान सह अचला ताई मेसन , दुर्गा शिवणकर, मंगला हेडाऊ ह्या मनसे महिला सेना पदाधिकारी उपस्थित होत्या.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement