Published On : Wed, Aug 11th, 2021

एसबीएम विकास सेवा संस्थेच्या वतीने माजी महापौर जोशी यांना निवेदन

Advertisement

नागपुर – एस.बी.एम. विकास सेवा संस्थेच्या वतीने निवेदनात म्हटले की, नागपूर महानगर पालिकेतील अधिसंख्य सफाई कामगारांना नियुक्ती देताना लावण्यात आलेल्या अधिसंख्य हा शब्द वगळून इतर सफाई कामगार प्रमाणे फक्त सफाई कामगार असे संबोधण्यात यावे. भा.ज.पार्टी अनुसूचित जाति मोर्चाचे प्रदेश सचिव सतीश सिरसवान यांनी माजी महापौर संदीप जोशी यांना नुकतेच दिलेल्या निवेदनाद्वारे सफाई कामगारांच्या विविध प्रश्न मार्गी लावण्याकरिता निवेदन दिले. नागपूर महानगर पालिकेच्या निर्मितीपासून आज पर्यंत ऐवजदार कार्ड वाटप करून त्यांच्याकडून साफ सफाईची कामे करवून घेतली जात होती. कालांतराने त्यांनाच स्थायी सफाई कामगारांना या पदावर नियमित नियुक्ती देऊन शासनाच्या वेतन दरानुसार वेतन देण्यात येत होते.


परंतु 20 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार ऐवजदार सफाई कामगारांना अधिसंख्या सफाई कामगार म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. त्यामुळे सदर ऐवजदार सफाई कामगार सध्याचे कार्यरत अधिसंख्य सफाई कामगार यांच्यावर अन्याय होत आहे. मनपाच्या पूर्व परंपरेनुसार सदर अधिसंख्या सफाई कामगार यांना फक्त (सफाई कामगार) म्हणूनच नियुक्ती देऊन आदेशातील (अधिसंख्य) हा शब्द वगळून इतर सफाई कामगारा प्रमाणे सुधारित अध्यादेश काढून सफाई कामगारांना न्याय मिळवून द्यावा. सतीश सिरसवान यांनी निवेदनात म्हटले की, नागपूर महानगर पालिकेतील अधिसंख्य सफाई कामगारांना नियुक्ती देताना लावण्यात आलेल्या अधिसंख्य हा शब्द वगळून इतर सफाई कामगार प्रमाणे फक्त सफाई कामगार असे संबोधण्यात यावे.

आणि कोव्हीड -19 कोरोना, कालावधीत स्थायी व अस्थायी सफाई कामगार संक्रमित होऊन त्यांचा मृत्यू झाला अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना किंवा कुटुंबियांना “विशेष अनुकंपा ” लावून मानवतेच्या आधारित तात्काळ स्थायी नियुक्ती देण्यात यावी. यावेळी सतीश सिरसवान, नितीन वामन, नूतनताई, संतोष तृकेल, राजू चौव्हाण, बबीता शंदुरनीकर टिकाराम लोखंडे, सुरेश सिरामे, अविनाश सहारे, अमित चिमाटे, आशिष हाडके आदींची उपस्थिती होती. सफाई कामगारांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी केली आहे.