नागपुर – नागपूर शहरासह संपूर्ण राज्यात दिवसेंदिवस कोविड-19 च्या केसेस वाढत आहेत. ही महामारी थांबविण्याचा एकमेव उपाययोजना म्हणजे सोशल डीस्टसिंग आहे. गेल्या तीन महिन्यात लॉकडाऊन दरम्यान ट्राफिक विभागाकडून योग्य खबरदारी घेण्यात आली, त्याबाबत ट्राफिक विभागाचे मनस्वी अभिनंदन…. परंतु गेल्या काही दिवसात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट दिली, त्यानंतर नागपूरकर रस्त्यावर कामानिमित्य घराबाहेर पडायला लागले आहेत. यामध्ये दुचाकी वाहन चालक नियमाचे उल्लंघन करताना दिसतात, यात काही शंका नाही. परंतु या महामारीचे वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यांच्यावर होणारी कार्यवाही सोशल डीस्टसिंगचे पालन करून व्हायला पाहिजे. ते शहरात वाहतूक पोलिसांकडून होतांना दिसत नाही. अनेक पोलीस एकदम वाहनाच्या समोर उभे होतात, परवाना किंवा इतर कागदपत्रांची मागणी करतात आणि चालान फाडून नगदी रकमेची मागणी करतात, यामध्ये सरासरी सोशल डीस्टसिंगचा फज्जा उडतांना दिसत आहे. यामुळे पोलिसांना किंवा वाहन चालकांना कोविड-19 ची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अश्या कठीण परीस्थित हा प्रकार तातडीने थांबविणे गरजेचे आहे.
दुसरा मुद्दा असा की, जुन्या काही चालान असल्यास त्याची वसुली आपले वाहतूक पोलीस करीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने चारचाकी वाहनाचा समावेश आहे. जर भूतकाळात राष्ट्रींय महामार्गावर कोणी एखादया नियमाचे उल्लंघन केले असल्यास त्याचे चालान शहराच्या चौकात पोलीस नगदी रक्कम भरण्यास भाग पाडत आहेत. नियमानुसार जर नियम मोडत असल्यास त्याची सूचना त्याला २४ तासाच्या आत किंवा जास्तीत जास्त सात दिवसात दिल्या गेली पाहिजे. एखाद्यानी सहा महिने आधी राष्ट्रीय महामार्गावर स्पीडचे उल्लंघन केले असेल तर त्याला आता चौकात थांबवून नगदी रकमेची मागणी करणे चुकीचे आहे. तसेच सरकारी आदेशानुसार लॉक डाऊन काळात वाहन चालका कडून कोणतीही वसुली करण्यात येणार नाही.
परंतु ट्राफिक विभागाचे कर्मचारी चौकात गाड्या थांबवून लोकांचा वेळ घालवतात, सोशल डीस्टसिंगच्या नियमाचे उल्लंघन करून स्वतचा आणि इतर नागरिकांचा जीव धोक्यात टाकणे हे जनहितार्थ किंवा राष्ट्रहितार्थ वाटत नाही. कोणत्याही चौकात पोलिसांकडून होणारे नगद देवाण-घेवाण व्यवहार बंद करण्यात यावीत. लॉक डाऊन संपेपर्यंत कोणत्याही दंडाची सक्तीने वसुली करण्यात येवू नये.
वरील निवेदन मा. उप आयुक्त( शहर वाहतूक शाखा) श्री विक्रम साळी नागपूर यांना आम आदमी पार्टी, नागपूर तर्फे देण्यात आले. आयुतांनी उपरारत विषयावर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यात आम आदमी पार्टी राज्य कोशाध्यक्ष श्री जगजीत सिंग, नागपूर संयोजक कविता सिंघल, राज्य समिती सदस्य श्री देवेंद्र वानखेडे, राज्य सह सचिव श्री अशोक मिश्रा , नागपूर शहर सचिव श्री भूषण ढाकुलकर हे उपस्थित होते.