Published On : Tue, Jun 9th, 2020

कामठी नगर परिषद मध्ये स्वेब सॅम्पल तपासणी बूथ कार्यान्वित

Advertisement

कामठी :-नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहरात कोरोना विषाणूचा धोका घोंगावत असल्याने प्रशासन गांभीर्याने खबरदारीची भूमिका घेत विविध उपाययोजना राबवित असून या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कामठीवर जिल्हा प्रशासनाचे विशेष लक्ष केंद्रित आहे यावर खुद्द जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त ,जिल्हा परिषद आयुक्त यांनी कामठी शहरात भेट देऊन विशेष लक्ष देत आहेत या पाश्वरभूमीवर आज पासुन संपूर्ण शहरातील 17 हजार 400 कुटुंबीयाचे सर्वेक्षण करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 240 निरीक्षक अधिकाऱ्यांची नियुक्ती करीत हे निरीक्षक अधिकारी पुढील सहा महिन्यापर्यंत सर्वेक्षण करणार आहेत तसेच नागरिकांची तातडीने कोरोना टेस्ट होणे गरजेचे असल्याने कामठी नगर परिषद मध्ये स्वेब टेस्टिंग बूथ ची सोय करण्यात आली आहे नवीन तंत्रज्ञानावर आधारित हे स्वेब सॅम्पल तपासणी बूथ नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यातून एकमेव कामठी तालुक्याला प्राप्त झाला आहे हे इथं विशेष! तसेच या कोविड -19 स्वेब सॅम्पल कलेक्शन बूथ आजपासून कार्यान्वित करण्यात आले असून दरम्यान सर्वेक्षण मध्ये आढळलेल्या संशयित रुग्णाच्या स्वेब चे नुमने घेण्यात आले.

या कोविड 19 स्वेब सॅम्पल कलेक्शन बूथ कार्यन्वित करण्याच्या प्रक्रियेत एसडीओ श्याम मदनूरकर, तहसीलदार अरविंद हिंगे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी फुलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खानुनो , वैद्यकीय अधीक्षक डॉ श्रद्धा भाजीपाले यांची मोलाची भूमिका असल्याचे सांगण्यात येते.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनातर्फे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन चा पाचव्या टप्प्यात तसेच सध्यस्थीतीत लागू असलेल्या अनलॉक 1 च्या स्थितीत कामठी शहरात मोठ्या संख्येत नागरिकांचे लोंढे सरकत आहेत त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे त्यामुळे प्रशासनातर्फे खबरदारी घेण्यात येत आहे.समाजामध्ये कोरोना पॉजीटिव्ह असणाऱ्याचा स्वब टेस्ट घेणे गरजेचे आहे या पाश्वरभूमीवर अनेक नागरिकांची तपासणी करणे आवश्यक आहे.त्यातच पीपीई किट ची संख्या ही मर्यादित असल्यामुळे तपासणी करण्याबाबतच्या मर्यादा आहेत तेव्हा संशयित कोरोना बधित रुग्णांची स्वेब सॅम्पल तपासणी जलद गतीने होण्यासाठी कामठी नगर परिषद मध्ये कोविड-19 स्वेब सॅम्पल कलेक्शन बूथ हे उपकरण कार्यान्वित करण्यात आलेले आहे.

वास्तविकता कोरोणाबधित रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर , नर्स व तंत्रज्ञ यांचा रुग्णांशी खूप जवळून संपर्क येतो आणि त्यातून त्यांनाही संसर्ग होण्याची शक्यता असते या स्वेब टेस्टिंग बूथ मध्ये तपासनि करणाऱ्या तंत्रज्ञ आणि रुग्णामध्ये सुरक्षित अंतर राहील व रुग्णाच्या शिंकण्याचा वा खोकलण्याचा थेट परिणाम होणार नाही . नवीन तंत्रज्ञानावर आधारित हे स्वेब टेस्टिंग क्यूब नागपूर जिल्ह्यात नागपूर शहरा नंतर फक्त कामठीत बसविण्यात आले आहे तर या कोरोना विषाणूचा लागण तपासणी करणाऱ्या होऊ नये यासाठी ही स्वेब सॅम्पल तपासणी बूथ लावण्यात आले आहे

संदीप कांबळे कामठी