Advertisement
कामठी:- सर्वत्र थैमान घातलेक्या कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनातर्फे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन च्या पाचव्या टप्यानंतर लागू झालेल्या अनलॉक 1 मध्ये कामठी शहरात लागू असलेल्या निर्बंधावर शिथिलता आल्याचे दिसून येते यात कामठी शहरातील कित्येक व्यवसायांना दिलेल्या मुभा नुसार शहरात सर्वसामान्य परिस्थिती दिसून येते तेव्हा आरोग्याच्या दृष्टिकोनातुन शारीरिक मजबुती साठी उपयुक्त असलेले व्यायाम शाळेला सुद्धा मुभा देत शहरातील व्यायाम शाळा, जिम सुरू करण्याची परवानगी देण्यासाठी कामठी जिम संघटनेच्या वतीने आज कामठी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार ला सामूहिक निवेदन देण्यात आले
निवेदन देण्यात नायडू जिम, बुल्स जिम, द म्युजिक वर्ल्ड,फिटनेस जिम, कपिल जिम, व्ही स्कोअर जिम, मॅक्स जिम, फिटनेस वर्ल्ड, किंगस फिटनेस, पॉवर जिम , द बॉस आदींचा समावेश होता