Published On : Fri, Jun 11th, 2021

स्थायी पट्टे मिळण्याच्या मागणीसाठी तहसिलदारांना दिले निवेदन

Advertisement

कामठी :- कामठी शहरांतर्गत नझुलच्या जागेवर अनेक वर्षापासून रहिवासी असलेल्या नागरिकांना शासना कडून स्थायी पट्टे मिळण्याच्या मागणीसाठी नगरसेवक काशिनाथ प्रधान यांनी तहसीलदार अरविंद हिंगे यांना निवेदन दिले

तहसीलदार अरविंद हिंगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,कामठी शहरातील विविध प्रभागात णझुलच्या च्या जागेवर घरे मोठया प्रमाणात वास्तव्यास आहेत त्या नागरिकांना पंतप्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधकामाकरिता स्थायी पट्टे आवश्यक आहेत नगर विकास मंत्रालय महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक एम यू एन सन 2018 नुसार स्थायी पट्टे वितरित करणे आवश्यक होते परंतु शासनाच्या वतीने नझुल च्या जागेवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अजून पर्यंत पट्टे वितरित करण्यात आले नाहीतो त्यामुळे नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे

राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात काही दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत त्यांनी विभागीय आयुक्त यांना कामठी शहरातील नझुल च्या जागेवर वास्तव्यासअसणाऱ्या नागरिकांना स्थाई पट्टे त्वरित वितरित करण्याचे आदेश दिले होते परंतु शासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही शासनाच्या वतीने त्वरित स्थायी पट्टे देण्याची मागणी नगरसेवक काशिनाथ प्रधान यांनी केली आहे