Published On : Fri, Jun 11th, 2021

एसडीओ मदनूरकर यांनी घेतला घरकुल योजनेचा आढावा

– नझुल जमिनीचे पट्टे लवकरात लवकर वितरित करा:-एसडीओ श्याम मदनूरकर,नगरसेवक काशीनाथ प्रधान यांच्या निवेदनाची घेतली गांभीर्याने दखल

कामठी :-पंतप्रधान आवास योजने अंतर्गत कामठी नगर परिषद मध्ये घरकुल योजना राबविण्यात येत आहे.कामठी शहरातील अर्ध्यापेक्षा जास्त ठिकाणचे नागरिक हे नझुल च्या जागेवर वास्तव्यास आहेत. या घरकुल लाभार्थ्यांनी घरकुलचा लाभ मिळावा यासाठी स्थानिक नगर परिषद प्रशासनाकडे अर्ज करून वर्ष लोटले आहेत मात्र या योजनेतील अटी व शर्ती च्या अधीन राहून स्थायी पट्टे मिळाली नसल्याने कित्येक लाभार्थी हे घरकुल योजनेपासून वंचित आहेत तेव्हा घरकुल लाभार्थ्यांना घरकुल चा लाभ मिळावा यासाठी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने नागरीकाना नझुल जमिनीचे स्थायी पट्टे वितरित करण्यात यावे

Gold Rate
16 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,700 /-
Gold 22 KT ₹ 1,03,000 /-
Silver/Kg ₹ 1,29,800/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या मागणीचे निवेदन नगरसेवक काशीनाथ प्रधान यांनी तहसिलदार अरविंद हिंगे, मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना नुकतेच दिले असता या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत एसडीओ श्याम मदनूरकर यांनी आज कामठी तहसील कार्यालयात घरकुल योजनेसंदर्भात आढावा बैठक घेतली.या बैठकीत नझुल धारक नागरिकांना नझुल चे स्थायी पट्टे लवकरात लवकर वितरित करून घरकुल लाभापासून वंचित लाभार्थ्यांना लाभ मिळवुन द्या असे स्पष्ट निर्देश दिले.

याप्रसंगी तहसीलदार अरविंद हिंगे,मुख्याधिकारी संदीप बोरकर, भूमी अभिलेख अधिकारी सपना पाटील, नगरसेवक काशीनाथ प्रधान, नगरसेवक निरज लोणारे, नगरसेवक आरीफ कुरेशी, अन्वर हैदर आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement