Published On : Fri, Jul 10th, 2020

नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागातर्फे तहसीलदार रामटेक यांना दिले निवेदन

राजगृहवरील हल्याप्रकरणी तहसीलदार रामटेक यांना दिले निवेदन

रामटेक: ग्रंथप्रेमी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ग्रंथसंग्रह जपून ठेवण्यासाठी मुंबई येथे राजगृह हे घर बांधले.ही एक ऐतिहासिक धरोहर असून तिचे जतन आणि संरक्षण करणे ही शासनाची आद्य जवाबदारी आहे .परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “राजगृह” या निवासस्थानावार झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालय रामटेक येथे तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागातर्फे उपाध्यक्ष नितीन भैसारे , गज्जू यादव, सचिन किरपान यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ काँग्रेस नेते पी.टी. रघुवंशी,रामटेक विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल पाटील,नगर परिषद सदस्य दामोदर धोपटे, यादव जांभूळकर,सालई ग्रामपंचायतचे सरपंच राजेश भोंडेकर,वरघाट ग्रामपंचायतचे सदस्य संदीप इनवाते,गुणवंता मडकवार,हेमराज कंगाले व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.