बाल संरक्षण कक्षाची कार्यवाही
आई-वडिलांकडून घेतले हमी पत्र
नागपूर: भारतात गेल्या अनेक वर्षांपासून बालविवाह प्रथा संपुष्टात यावी यासाठी अनेक प्रयत्न झाले. यासाठी बालविवाह विरोधी बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ पारीत करण्यात आला. मात्र आजही अनेक राज्यांमध्ये बालविवाह होताना दिसत आहेत. महाराष्टÑात बºयाच प्रमाणात बालविवाह थांबले आहेत. परंतु अनेक समाजात आर्थिक परिस्थिती, दारीद्र्य यामुळे आजही बालविवाह होताना दिसतात. असाच काहीसा उपराजधानीपासून काही अंतरावरील कामठी येथे उघडकीस आला. मात्र महिला व बाल विकास विभागाच्या बाल संरक्षण कक्षाने कामठीतील एका १४ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात यश मिळविले. आई-वडिलांकडून हमीपत्र लिहून घेत विवाह थांबविण्यात आला.
चाईल्ड लाईनला सूचनेच्या आधारावर सामाजिक सुरक्षा पोलिस विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चॉईल्ड लाईन यांचे संयुक्त पथकाने आज गुरुवारी (९ जुलै) कार्यवाही करून कामठी येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह थांबविला. बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार १८ वर्षापेक्षा कमी असलेले व २१ वर्षापेक्षा वयाने कमी असलेल्या अल्पवयीन मुलांचे विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे.
चॉईल्ड लाईन नागपूर यांना कामठी येथे एका अल्पवयीन मुलीचे बालविवाह होणार असल्याची माहिती प्राप्त झालेली होती. चॉईल्ड लाईनने याबाबत माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथे दिली. त्यानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यातंर्गत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चॉईल्ड लाईन यांच्या पथकाने लग्नघरी भेट दिली. माहिती जाणूण घेतली असता मुलीच्या कागदपत्रावरून मुलीचे वय १४ वर्षे होते. २१ जुलै २०२० रोजी लग्नाचा मुहूर्त होता. लग्न पत्रिकाची वाटप करण्यात आल्या होत्या. सदर घटणास्थळी अंगणवाडी सेविका यांना बोलविण्यात आले. मुलीच्या आईवडिलांचे समुपदेशन करून मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नाही याचे हमीपत्र घेण्यात आले व होणारा बालविवाह थांबविण्यात आला. लग्न झाल्यास बालविवाह प्रतिबद्ध कायदा २००६ अंतर्गत वर व वधूकडील मंडळी लग्नात सहभागी होणारे पाहुणे सर्वांवर कार्यवाही होईल अशी लेखी स्वरूपात माहिती देण्यात आली.
सदर कार्यवाहीत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, संरक्षण अधिकारी अनुप देशमुख, चाईल्ड लाईन समन्वयिका छाया गुरव (राऊत), चाईल्ड लाईन टिम मेंबर सारिका बारापात्रे, पोलिस उपनिरीक्षक कल्पना कटारे, पंकज मारसींगे, अंगणवाडी सेविका स्मृती दहाट,एएसआय रंगराजन पिल्ले यांनी सहभाग घेतला.