Published On : Sun, Feb 16th, 2020

रमाई आवास योजनेच्या रखडलेल्या प्रकरणांसाठी निवेदन

Advertisement

नागपूर : प्रभाग क्र. ३० मधील शंकरसाई मठ शामबाग झोपडपट्टी जुना सक्करदरा सेवादल नगर या भागातील रमाई आवास योजनेअंतर्गत सन २००० पूर्वीच्या पुराव्यासाठी थांबविलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी घरबांधणी समितीच्या सभापती लक्ष्मी यादव यांना आरोग्य समितीचे उपसभापती तथा प्रभाग ३० चे नगरसेवक नागेश सहारे आणि दक्षिण भाजपा झोपडपट्टी मोर्चाचे अध्यक्ष श्याम थोरात यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

लाभार्थ्यांना लहान कारणासाठी थांबविल्यामुळे त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळाला नाही. यासाठी त्यांच्या अर्जातील त्रुटी तातडीने दूर करून त्यांना योजनेचा लाभ द्यावा, अशी विनंती निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.

सभापती लक्ष्मी यादव यांना भेटलेल्या शिष्टमंडळासोबत पूजा राऊत, सावित्री दांडेकर, लक्ष्मी देवरे, ज्योती कोलते, मुन्नीताई देशभ्रतार, करिश्मा गायकवाड, छायाताई भारसिंगे, पोर्णिमा मोटघरे, मनोहर देवगुणे, मायाबाई बागडे, प्रदीप बागडे, भीमराव मेश्राम, अनिल कोलते, ईश्वर मानवटकर उपस्थित होते. सन २०११ च्या शासन निर्णयानुसार लाभ मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी सभापती लक्ष् यादव यांनी दिले.