Published On : Sun, Feb 16th, 2020

निला चव्हाण हिने भारतातुन पटकाविला तृतिय क्रमांक

Advertisement

रामटेक : – वडोदरा गुजरात येथे तिसऱ्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्स असोशिएशनच्या क्रीडा स्पर्धेत ५ कि.मी. जलद चालण्याच्या खेळ प्रकारात सौ.निला सुभाष चव्हाण हिने संपूर्ण भारतातुन तृतिय क्रमांक पटकाविला . तिला सुप्रसिद्ध क्रीडा शिक्षक पती सुभाष चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

महाराष्ट्र मास्टर्स गेम्स असोशिएशनचे अध्यक्ष मा.प्रभाकर निंबुळकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र मास्टर्स गेम्स असोशिएशनचे सचिव मा.बाळा चव्हाण यांच्या शुभहस्ते मेंडल प्रदान करण्यात आले. सौ.निला ही एक गृहिणी असून तीने प्रथमच राष्ट्रीयस्तरावर थाळी फेक ,१०० मी धावणे व जलद चालण्याच्या स्पर्धेत देशातील अनेक दिगंज महिलानी सहभाग घेतल्याने ही स्पर्धा विशेष चुरसीची ठरली होती परंतु जिद्द व चिकाटीने काश्य पदक पटकाविल्यामुळे रामटेकमध्ये क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून रामटेक बसस्थानकावर येताच चाहत्यांनी पुष्प मालेनी पती -पत्नीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

ह्या उत्कृष्ट यशाबद्दल डॉ .अंशुजा किंमतकर , माजी सरपंच मा. योगिता गायकवाड , ऋषीकेश किंमतकर , डी.के.राठोड , विजय राठोड , अविनाश राठोड , एन.के.राठोड , सुरेश राठोड , रविद्र राठोड , अरुण जाधव, संजय जाधव, सोमेश्वर दमाहे , सोनू वेटेकर , चेतन गायकवाड ,राजेश राठोड आदीनी अभिनंदन केले तथा दररोजच फोन व सोशल मिडीयाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.