
नागपूर: वाहन कर्ज क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या श्रीराम फायनान्सच्या नागपूर येथील कार्यालयात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि करोना संकटकाळात उद्ध्वस्त झालेल्या वाहतूक व्यावसायिकांना दिलासा देण्याबाबत आग्रही मागण्या केल्या. “तुम्हाला जे काही करायचं असेल ते कायद्याच्या कक्षेत करा, कायद्याची मर्यादा ओलांडू नका” अशा शब्दांत श्रीराम फायनान्सला मनसे ‘समज’ दिली.
मनसेच्या या शिष्टमंडळात श्री. हेमंत भाऊ गडकरी (सरचिटणीस ) सचिन भाऊ धोटे (जिल्हा अध्यक्ष) अजय भाऊ ढोके (शहर अध्यक्ष ) मंगेश शिंदे (शहर अध्यक्ष ) प्रशांत निकम (उप शहर अध्यक्ष ) गजानन भाऊ टिपले(जिल्हा उपाध्यक्ष ) यांचा समावेश होता.
तसेच देवेंद्र जैन, विपीन धोटे, अमर भारद्वाज, प्रभुदास डोंगरे, सुजित मधुमटके, गुड्डू भाऊ मिश्रा, युवराज तळेगावकर, प्रवीण गायकवाड,शाहिद पटेल, योगेश भाऊ चौरसिया,हरिओम काटंकर, अजय मोडकर, बागडे गुरुजी, अंकुश शिंदे आदी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अनेक पदाधिकारी- कार्यकर्ते यांनी याप्रसंगी उपस्थित असून मोलाचं सहकार्य केलं.
श्रीराम फायनान्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी उत्तर देण्याचं आश्वासन दिलं आहे.
Why Are Cows Sitting on Nagpur Roads During Monsoon? | Real Reason...
₹28,325 Crore Hidden Debt? CAG Report on Maharashtra Explained in 60 Seconds
खापा में तेज रफ्तार ट्रक पलटा, दो घायल... #nagpurnews #Khapa #RoadAccident #TruckAccident...
नागपुर सेंट्रल जेल में 'गले मिलन' की अनोखी पहल... #NagpurNews #humanity #Emotional...
पासवर्ड से खोला लॉकर, 40 हजार लेकर फरार! #NagpurNews #crime #Theft #CCTV...
बैंक से निकाले 50 हजार, बाहर निकलते ही ठगों ने कर दिया...




