Published On : Wed, Apr 8th, 2020

राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाची तिलनगी पारधी वस्ती येथील हातभट्टी दारु निर्मिती ठिकाणी संयुक्त छापे

नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने सावनेर तालुक्यातील केळवद पोलीस स्टेशन हद्दीतील तिलनगी पारधी वस्ती येथे मोहा हातभट्टी दारु निर्मिती ठिकाणी छापा टाकून रुपये २ लाख ३७ हजार किमतीचा दारुबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल ताब्यात घेतला.

कोरोना १९ पार्श्वभूमीवर सर्व दारु ची दुकाने बंद आहेत त्यामुळे अवैद्य मोहा दारूची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती मिळाले वरुन पोलीस अधीक्षक ओला सर यांचेशी चर्चा करुन विभागीय उप आयुक्त मोहन वर्दे व अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शना खाली निरीक्षक मुरलीधर कोडापे व सुनील सहस्त्रबुद्धे व पोलीस विभागाचे निरीक्षक सुरेश मट्टानी, API पंकज वाघोरे यांनी ही कारवाई केली.

या कारवाई मध्ये २०० लिटर क्षमतेचे १२ भट्टी ब्यारेल्स, रसायनाने भरलेले २०० लिटर क्षमतेचे ७० व ५० लिटर क्षमतेचे ३७ प्लास्टिक ब्यारेलस रसायनाने भरलेले, तयार दारु २५० लिटर तसेच चाटू व जर्मन घमेली, काळा गूळ २०० किलो इत्यादी दारुबंदी गुन्ह्यातील साहित्य असा रुपये २ लाख ३७ हजार किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. आरोपी फरारी असून पुढील तपास मुरलीधर कोडापे व सुनील सहस्त्रबुद्धे करत आहेत.

याकामी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जादा स्टाफ मंजूर केल्या मुळे कारवाया सुलभतेने करणे शक्य होत आहे. या कारवाई मध्ये दुय्यम निरीक्षक बाळू भगत, रवींद्र सोनोने, राजेश मोहोड, कॉन्स्टेबल मिलिंद गायगवळी, अमोल बोथले, समीर सईद, संजय राठोड, सुधीर मानकर, रमेश कांबळे, महिला जवान शीतल सरोदे, वाहन चालक मिलिंद गायकवाड, सुभाष शिंदे व देवेश कोटे, तसेच दहा पोलीस कर्मचारी व दहा होमगार्डस यांनी सहभाग घेतला.