Published On : Wed, Apr 8th, 2020

कढोली गावात रिकामटेकड्यांचे बैठकस्थान केले काळेभोर

Advertisement

कामठी:- संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव संपूर्ण भारतासह महाराष्ट्रातही पोहोचला असून कामठी तालुक्यात या कोरोना विषाणू ने थैमान घातल्याने तालुका प्रशासनाच्या वतीने कोरोना व्हायरस चा संसर्ग टाळण्यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा करीत आहे त्यात विशेषता पोलीस वर्ग, आरोग्य विभाग तसेच महसूल विभाग जीवाचे रान करून आपला जीव धोक्यात घालून कर्तव्यदक्ष भूमिका बजावीत या कोरोना विरुद्ध च्या लढाईचे योद्धा म्हणून कार्यरत आहेत

या तालुका प्रशासनाला तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातून प्रतिसाद मिळत असला तरी काही रिकाम टेकडे विनाकारण घरा बाहेर पडत असू न तासंनतास सामूहिक गप्पा गोष्टीतून वेळ घालवत असतात .कोरोना विषाणूचे गांभीर्य लक्षात घेत नसल्याने या कोरोना विरुद्ध च्या लढाईत प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी कढोली ग्रामपंचायत च्या वतीने गावातील बैठक स्थानाचे काळ्या ऑइल ने रंगवून काळेभोर करण्यात आले.

सरकारने कोरोनाचा अटकाव करण्यासाठी व त्याची साखळी तोडण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात आल्या आहेत या उपाययोजनाला लोकांची साथ मिळने अपेक्षित आहे मात्र कढोली गावात काही रिकामटेकडे गावातील सिमेंट च्या बाकावर बसून गप्पागोष्टी करून वेळ घालवीत होते . आपल्यासह सर्वांचे आरोग्यासाठी लोकडॉऊन महत्वाचे असल्याने प्रशासनातर्फे घरातच राहा, निरर्थक बाहेर पडू नका प्रशासनाला सहकार्य करा असे फर्मान सोडण्यात आले

आहे.रस्त्यावर कर्तव्य बजवत असलेला पोलीस दादा भीतीपोटी घरी गेल्यावर स्वतःच्या कुटुंबाशी भीतीपोटी दूर दूर राहतो त्यातच नागरिकांना फक्त घरी राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान करीत असले तरी काही रिकाम टेकडे निरर्थक घराबाहेर पडून बाहेर तासंनतास बसून प्रशासनाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन करून प्रशासनाला प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात घेऊन गावातील सिमेंट बाकाला काळ्या ऑइल ने काळेभोर करून रंगवून टाकण्याचा निर्धार करीत या रिकाम टेकड्यावर नियंत्रण साधल्याच एकमेव उपाय झाल्याने सरपंच प्रांजल वाघ यांचे सर्वतोपरि कौतुक करण्यात येत आहे.