Published On : Mon, Sep 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात आश्रमशाळांचा राज्यस्तरीय मेळावा; बावनकुळेंकडून विद्यार्थ्यांसाठी AI-डिजिटल शिक्षणावर भर

Advertisement

नागपुरात आश्रमशाळांचा राज्यस्तरीय मेळावा; बावनकुळेंकडून विद्यार्थ्यांसाठी AI-डिजिटल शिक्षणावर भर

नागपूर : महाराष्ट्र राज्य अनुदानित आदिवासी आश्रमशाळा संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन नागपुरात पार पडले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या अधिवेशनात आश्रमशाळा, संस्थाचालक आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी किशोर वानखेडे यांची राज्य अध्यक्षपदी, तर माजी आमदार टेकचंद सावरकर यांची कार्याध्यक्षपदी एकमताने निवड झाली.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्राधान्य देत आश्रमशाळांमध्ये दर्जेदार शिक्षण, पौष्टिक आहार, आरोग्य सुविधा तसेच AI आणि डिजिटल शिक्षण उपलब्ध करून देण्याची गरज बावनकुळे यांनी व्यक्त केली. आश्रमशाळांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

Gold Rate
Sept 28,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 49,200 /-
Gold 22 KT ₹ 1,38,500 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संस्थाचालकांच्या प्रश्नांसाठी समन्वय समिती; दरमहा बैठकीचा प्रस्ताव-

संस्थाचालक, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त आणि सचिव यांची संयुक्त समन्वय समिती स्थापन करण्याचा विचार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. आश्रमशाळा आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दरमहा बैठक घेण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Advertisement

दरम्यान, संस्थाचालकांवर विनाचौकशी फौजदारी कारवाई थांबवावी, ‘पवित्र पोर्टल’वर उमेदवार न मिळाल्यास संस्थास्तरावर शिक्षक भरतीला परवानगी द्यावी, चतुर्थश्रेणी पदे पूर्ण वेतनावर भरावीत, ८० किलोमीटर प्रवेशाची अट रद्द करावी, तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि वाढीव आकस्मिक अनुदान द्यावे, अशा मागण्या अधिवेशनात मांडण्यात आल्या.

अधिवेशनाला राज्यभरातील सुमारे ५०० संस्थाचालक व प्रतिनिधी उपस्थित होते. अधिवेशनानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.