Published On : Mon, Mar 20th, 2017

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाची रायटर्स बॅंक

blind Student
पुणे:
शारीरीक अपंगत्वामुळे असंख्य विद्यार्थी परीक्षा देण्यास असमर्थ असतात. त्यांना परीक्षेसाठी लेखनिक मिळविण्यास खुप कष्ट घ्यावे लागतात व तसे न झाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. पण या त्रुटींवर मात करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रायटर्स बॅंक स्थापन करण्याचा विचार शासन करीत आहे.

लेखनिक मिळत नसल्याच्या हजारो तक्रारी शिक्षण विभागाकडे दरवर्षी दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून येतात. त्यावर उपाय म्हणून ‘रायटर्स बँक’चा पर्याय स्वागतार्ह मानला जात आहे. त्यामुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांना, पदाधिकाऱ्यांना लेखनिक होण्यासाठी इच्छुकांच्या याद्या बनविण्यात येणार आहेत.

लेखनिकांच्या याद्या पोर्टलवर
राज्य शासनाच्या शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांना शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि जिल्हा पातळीवर ‘लेखनिकां’ची यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच शाळांनुसार लेखनिकांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहेत.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कसे सुरु असणार काम
दिव्यांग मुलांची समस्या नेमकी जाणून संवेदनशीलतेने विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच ज्येष्ठ नागरिकांची वेगळी यादी बनवली जाणार आहे.

यादी तयार करताना शक्यतो इच्छुक लेखनिक संबंधित गरजू विद्यार्थ्याची शाळा वा कॉलेजजवळ राहणारा असावा हेही पाहिले जाणार आहे.

‘दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी, अभ्यासासाठी वाचक किंवा लेखनिक म्हणून साहाय्य करण्याची इच्छा असणारे अनेक जण असतात, पण ही मदत नेमकी कशी करायची हे त्यांना समजत नाही. ‘रायटर्स आणि रिडर्स बँक’मुळे गरजू विद्यार्थी आणि मदतीला तत्पर असणाऱ्यांमध्ये एक सेतू निर्माण होईल.

– सुवर्णा खरात, उपसचिव, शिक्षण विभाग

Advertisement
Advertisement