| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Apr 2nd, 2019

  पुलाच्या निर्माण कामात मोफतची वाळू व पाण्याचा सरास वापर सुरू

  मेहर फाऊडेशन एन्ड सिविल कँट्रक्शनवर महसुल चोरीचा ६ लाख ९५ हजार रू दंडात्मक कार्यवाही.

  कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील कन्हान नदीवरील पुलाचे निर्माणकाम मागील साडे चार वर्षापासुन सुरू असुन यात वाळु व पाण्याचा बिना परवानगी सरास वापर सुरू असल्याने पारशिवनी तहसीलदार यांनी ताकीद देऊन वाळु व पाण्याचा महसुल चोरी बाबत कारवाही करून मेहर फाऊडेशन एन्ड सिविल कँट्रक्शन कंपनीवर ६ लाख ९५ हजार रू दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. ही कारवाई मागील चार वर्षांत का करण्यात आली नाही, पुढे सुध्दा महसुल अधिकारी कर्तव्य बजावतील का ? किंवा कंत्राटदाराशी सगंनमत करतील. अशी नागरिकांत चर्चेचा विषय बनला आहे.

  कन्हान नदी ही नागपुर जिल्हयाची जलवाहिनी म्हणुन नाव जितके प्रसिद्ध आहे. तितकेच येथील ब्रिटिश कालीन ते वर्तमान वेळेसच्या पुलामुळे भारतासहित विदेशातही याची नोंद आहे. ज्यामुळेे येथील सुरू असलेल्या रेल्वे व राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाचे निर्माणधिन काम हे पारदर्शक असणे सहज बाब आहे, परंतु या कन्हान नदीच्या पुल निर्माणधिन कामात सुरू असलेल्या बिना परवानगी वाळु व पाण्याच्या बिनधास्तपणे वापर, महसुल बुडविणे यावरून अधिकाऱ्यां च्या कामातील पारदर्शिकते वर प्रश्न निर्माण करीत आहे. कन्हान येथील राष्ट्रीय महामार्गाचे पुलाचे बांधकाम खरे एन्ड तारकुडे कंपनीला देण्यात आले असुन मागील साडेचार वर्षा पासुन मंदगतीने सुरू आहे.

  रेल्वे पुलाचे काम मेहर फाउडेशन एण्ड सिव्हील कँंट्रक्शन कपंनीला देण्यात आले असून या पावसाळया नंतर सुरू करण्यात आले आहे. या दोन्ही कंत्राटदारांना बिना परवानगी वाळु व पाण्याचा वापरास बंद करण्याची ताकीद देऊन सुध्दा सुरू असल्याने दि१२ डिसेंम्बर २०१८ रोजी तहसीलदार वरून कुमार सहारे यांनी महाराष्ट्र लॅंड ४८/८ नियम १९६६ धारा नुसार आकास्मित कार्यवाही करीत ६,९५,२०० रुपयाचे दंड ठोठावला व ३१ मार्च २०१९ पर्यंत भरण्याची मुद्दत दिली होती.

  तसेच नदीतील पाणी वापरण्या करिता कुठलिही परवानगी न घेता मेहर फाऊंडेशन व खरे ऍण्ड तारंकुडे कंपनी द्वारे पुलाच्या पिल्लर व रोडवर मोटर लाऊन टॅकर नी पाण्याचा वापर सुरूच असल्याने तहसीलदार यांच्या आदेशानुशार दंड स्वरूपाची रक्कम न भरल्याने कन्हानचे पटवारी महेंद्र श्रीरसागर यांनी सुरू असलेल्या कंपनीचे मशीन व गाडी जप्त करण्यास गेले असता. ही माहिती मेहर फाऊडेशन कंपनीचे प्रकल्प अधिकारी सचिन देवकाते यांना देण्यात आली असता वाहन मशीन जप्तीच्या भीतीपोटी दंड झालेली रक्कम भरण्यात आली. ही माहिती तहसीलदार वरूनकुमार सहारे यांनी फोन वर सांगितली.

  या वर्षी अल्प पाऊसामुळे नदी नाले कोरडे असून पिकाचेही फार मोठय़ा प्रमाणात शेतकऱ्याला नुकसान सहन करावे लागले आहे. तर पाणी करिता सर्वस्त्र नागरिकांची भटकंती पाहायला मिळत आहे. कन्हान नदी ही नागपुर जिल्हयाची जलवाहिनी म्हणुन येथील रेती घाटावर बंदी घातली आहे . दुसरीकडे कुठलीही परवानगी न घेता कंत्राटदार बिनधास्त वाळु व पाण्याचा पुलाच्या व रोडाच्या कामात सरासपणे वापर करित आहेत. नदीत जलसाठा कमी असल्याने कन्हान शहरात दोन ते चार दिवसा आड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यास्तव पुलाच्या कामात वापरणारे पाणी कुठून व कुणाच्या परवानगीने देण्यात आले आहे.

  या बाबत नगर परिषद कन्हानचे मुख्यधिकारी व सिंचन विभागाचे अभियंता भीतीपोटी कुठलेही उत्तर देण्यास टाळाटाळ करीत आहे. खरे एण्ड तारंकुडे कंपनीने पाणी टाकण्याचे काम संचेती नावाची कंपनी ला दिले. या कंत्राटदारांना वाळुच्या व पाण्याचा सरास वापरण्या करिता अभय व आर्शिवाद कुणाचा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145