Published On : Mon, Dec 24th, 2018

मेट्रोच्या एलिव्हेटेड सेक्शनवर इलेक्ट्रीफिकेशन वायर लावण्यास सुरवात

२८ मीटर उंचीवर ‘आरआरव्ही’च्या साहयाने होत आहे कार्य

नागपूर :एयरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान ऍट ग्रेड (जमीनस्तरावर) सेक्शनवर मेट्रोच्या जॉय राईड संकल्पनेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असतांनाच आता एलिव्हेटेड (जमिनीस्तरावरून उंच) सेक्शनवर देखील मेट्रो गाडीच्या संचालनाच्या दृष्ठीने कार्याला सुरवात झाली आहे. या अंतर्गत एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी मेट्रो जंक्शन दरम्यान मेट्रो ट्रेन चालविण्याच्या दृष्ठीने इलेक्ट्रीफिकेशन कार्याला सुरवात झाली आहे.

Gold Rate
14 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,200 /-
Gold 22 KT ₹ 93,200 /-
Silver/Kg ₹ 1,16,100/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मेट्रो चालविण्यासाठी मेट्रो ट्रॅक वरून ६ मीटर पेक्षा ज्यास्त उंचीवर हे इलेक्ट्रीफिकेशन वायर बसविण्यात येतात. मेट्रो ट्रेन चालविण्यासाठी २५ हजार वोल्ट पुरवठ्याची आवश्यकता असते जी या इलेक्ट्रीफिकेशन वायरच्या माध्यमाने पूर्ण होईल. आज पहिल्या दिवशी एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते उज्वल नगर पर्यंत इलेक्ट्रीफिकेशन वायर जोडण्याचे कार्य मेट्रोच्या अधिकाऱ्याने पूर्ण केले. अगदी बारकाईने हे कार्य पूर्ण केले जात असून याच्याशी संबंधित इतर कार्य देखील निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न मेट्रोचे अधिकारी करीत आहेत. जमिनी पासून २८ मीटर उंचीवर सुरक्षा नियमांचे पालन करून दिवस रात्री हे कार्य सुरु आहे.

महत्वाचे म्हणजे एका विशिष्ठ प्रकारच्या वाहनाच्या माध्यमाने हे कार्य केले जात आहे. आरआरव्ही (रेल कम रोड व्हेकल) प्रकारच्या गाडीच्या साहयाने मेट्रोचे इलेक्ट्रीफिकेशन वायर (क्याटनरी कंडक्टर) जोडण्याचे कार्य करण्यात येत आहे. आरआरव्ही (रेल कम रोड व्हेकल) हे वाहन दिसायला जरी साध्या ट्रक सारखे असले तरी यात इलेक्ट्रीफिकेशन वायर लावणारे उपकरण बसविण्यात आले आहे.

उल्लेखनीय म्हणजे हे वाहन मेट्रो ट्रॅक वर चालू शकेल यासाठी लोखंडी चाके लावण्यात आले आहे. यामुळे इलेक्ट्रीफिकेशन वायर लावत असताना हे वाहन सहज एका स्थळावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यास मदत होते. व या वाहनाला साध्या ट्रकचे चाक लागले असल्याने हे वाहन रोड वर सुद्धा चालण्यास पूर्णपणे सक्षम असते. या वाहनांमुळे इलेक्ट्रीफिकेशन वायर जोडण्याचे कार्य वेगाने आणि वेळेत पूर्ण होते.

Advertisement
Advertisement