Published On : Fri, Apr 24th, 2020

औधोगिक क्षेत्रातील 70 उधोग सुरू कामगारांना सुरक्षित वातावरण जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे

Advertisement

कामगारांसाठीच्या वाहनांची परवानगी तहसीलदार देणार

नागपूर : लॉक डाउनच्या निर्बंधा मध्ये केंद्र शासनाने उधोग क्षेत्रात कोरोना च्या पार्श्वभूमीवर आवशयक उपाययोजना करून उधोग सुरू करण्याला परवानगी दिली असून औधोगिक क्षेत्रातील सुमारे 70 उधोग सुरु झाले आहेत, कामगारांना सुरक्षित वातावरण निर्माण करून आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्यामुळे कामगारांनीही पूर्ववत कामाला सुरुवात करावी असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे,

किल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज औधोगिक क्षेत्रातील कारखान्यांना भेट देऊन पाहणी केली , तसेच कामगारांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्यात, कोरोना विषाणू पासून संरक्षण करण्यासाठी सामाजिक सुरक्षित अंतर पाळणे, मास्क घातल्या शिवाय प्रवेश न करणे, सॅनिटायझर चा वापर, खोकलताना घ्यावयाची दक्षता आदी खबरदारी घेतल्यास कोरोना पावून संरक्षण होईल,

उधोग सुरू झाल्यामुळे जे कामगार परिसराच्या बाहेर रहातात त्यांना तहसीलदार व पोलिस स्टेशन प्रमुख कामगारांच्या वाहतूक साठी वाहनपर्वाणगी देतील, त्यामुळे उधोग सुरू करताना कोरोना संदर्भात दिलेल्या सुविधा पूर्ण कराव्यात व कामगारांनीही कामाला सुरुवात करावी असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे,