Published On : Wed, Sep 11th, 2019

बर्डी ते एम्स आपली बस सेवा सुरू

Aapli Bus

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे मिहान नागपूर येथील अखिल भारतीय वैद्यकीय अनुसंधान संस्था (एम्स) येथे उपचार व प्रशिक्षणासाठी जाणा-या व येणा-या नागरिकांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी आपली बस सेवा सरू करण्यात आली आहे.

नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवेचा लाभ घेता यावा यासाठी नागरिकांच्या सुविधेसाठी मनपातर्फे बर्डी ते बुटीबोरी मार्गे अखिल भारतीय वैद्यकीय अनुसंधान संस्था (एम्स) व बर्डी ते अखिल भारतीय वैद्यकीय अनुसंधान संस्था (एम्स) अशा दोन मार्गे आपली बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

बर्डी ते बुटीबोरी मार्गे अखिल भारतीय वैद्यकीय अनुसंधान संस्था (एम्स) बस सेवा सकाळी ६.१०, सकाळी ११.१०, दुपारी १.१० व सायंकाळी ८.२५ वाजता या वेळेमध्ये तर बर्डी ते अखिल भारतीय वैद्यकीय अनुसंधान संस्था (एम्स) बस सेवा सकाळी ६.३५, सकाळी ८.३५, सकाळी १०.५५, दुपारी १.१०, दुपारी ३.१०, सायंकाळी ५.१० व सायंकाळी ७.३० या वेळेमध्ये सुरू राहिल.

नागरिकांनी अखिल भारतीय वैद्यकीय अनुसंधान संस्था (एम्स) मिहान येथे जाणा-या बस सेवेला लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे.