Published On : Sat, Oct 24th, 2020

आपली बस सुरू करा मनसे महिलेंची मागणी

महाराष्ट्रात देशी दारुची दुकाने उघडी आपली बस बंद का? आपली बस सुरू करा मनसे महिला सेनेची मागणी शहरातील सिटी बस बंद असल्यामुळे नागरिकांना शारीरिक, मानसिक, आर्थिक ञास होत आहे. शहरातील व्यापारी दुकाने कार्यालय कारखाने सुरू आहे या कारखानान्यात हजारोच्या संख्येने नागरिक काम करतात जे या सिटी बसचा उपयोग ये-जा करण्यासाठी करतात. कळमेश्वर , कामठी, कन्हान , पारडी, गोधनी दाभा , अनेक भागातुन लोक या बसेसचा उपयोग करतात यामध्ये महिलाची संख्या अधिक प्रमाणात आहे . नोकरी करणाऱ्या अनेक महिलांनी मासिक पास बनवलेल्या आहे.

यामध्ये कमी खर्च महिलाना पडतो परंतु सिटी बस बंद असल्यामुळे खाजगी वाहनातुन प्रवास करावा लागतो आहे. याचे अधिक पैसे मोजावे लागतात आधीच महिलाना कोरोणा काळात वेतन कमी मिळत आहे आणि यावर अँटो रिक्षाने प्रवास करावा लागल्यामुळे अतिरिक्त खर्च महिलाना सहन करावा लागतो आहे.

अनलाँक प्रक्रिया मध्ये एसटी बस सुरू केली आहे. कमीत कमी महिलाकरिता सिटी बस का सुरू करत नाही. बाजार पूर्णपणे सुरू आहे. कोरोणाचा पादुर्भाव कमी झालेला आहे. कोविड -१९ च्या नियमांचे पालन नागरिक करत आहे. त्यामुळे महिलाच्या हक्काची आपली बस सुरू करण्यात यावी यासाठी आज शहर अध्यक्ष सौ मनीषा पापडकर यांच्या नैतृत्वात अतिरिक्त आयुक्त याना निवेदन देण्यात आले.


या विषयावर चर्चा करण्यात आली, दारुची दुकाने सुरू झाली परंतु आमच्या हक्काची आपली बस सुरू करायला काय ञास होत आहे ? या दोन दिवसात आपली बस सुरू केली नाही तर मनसे आक्रमक होईल. अतिरिक्त आयुक्त यानी १ नोव्हेंबर पासुन बस सुरू करणार आहोत असे म्हटले आहेत. यावेळी शहर पदाधिकारी सौ.स्वाती जैस्वाल , मंजुषा पानबुडे, मीनल ताजनेकर, उपस्थित होते.